ओम करांडे यास २७ व्या राष्ट्रीय सायकलींग स्पर्धत कास्यपदक. - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Friday, January 13, 2023

ओम करांडे यास २७ व्या राष्ट्रीय सायकलींग स्पर्धत कास्यपदक.

ओम करांडे यास २७ व्या राष्ट्रीय सायकलींग स्पर्धत कास्यपदक.
अहमदनगर - मुंबई -नागपूर समृद्धी महामार्गावर वावी (तालुका जुन्नर जिल्हा नाशिक ) येथे ७ ते १० जानेवारी २०२३ दरम्यान झालेल्या २७ व्या राष्ट्रीय रोड सायकलिंग स्पर्धात नगर तालुक्यातील दरेवाडी येथील ओम करांडे याला कास्य पदक मिळाले. सायकलिंग फेडरेशन ऑफ इंडिया आणि महाराष्ट्र सायकली असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने या स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या. संपूर्ण देशभरातून वेगवेगळ्या गटासाठी पुरुष व महिला स्पर्धक आपल्या राज्याचे नेतृत्व करत सहभागी झाले होते .ओम करांडे यांनी १८वर्षे वयोगटासाठी पुरुष ज्युनिअर गटातून महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व केले. सदर स्पर्धा ८० किमी अंतरासाठी होती. सदर गटातून वेगवेगळ्या राज्याचे ९० स्पर्धक सहभागी झाले होते. ही स्पर्धा अतिशय चुरशीची झाली. पहिले तीन स्पर्धक अगदी काह अगदी काही सेंटीमीटर च्या अंतराने विजेते ठरले. यात अहमदनगरचा ओम करंडे यास कास्य पदक मिळाली. व मागील वर्षी २६ व्या राष्ट्रीय सायकल स्पर्धेत पदक विजेता ठरला होता. ओम आतापर्यंत नगर, पुणे, बारामती अशा विविध ठिकाणी झालेल्या रोड सायकल स्पर्धेत पदकाचा मानकरी ठरला आहे.सलग दोन वर्ष राष्ट्रीय सायकली स्पर्धेत पदक विजेता ठरल्याने त्याचे सर्वांकडून कौतुक होत आहे. सदर स्पर्धेसाठी महाराष्ट्र असोसिएशनचे प्रतापराव जाधव, संजय साठे यांचे मार्गदर्शन लाभले.परीक्षक अभिनंदन भोसले यांनी परिश्रम घेतले.

No comments:

Post a Comment