यात्रेत गावगुंडांकडून भरदिवसा गोळीबार... दहशत पसरवण्याचा प्रयत्न. - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Thursday, January 12, 2023

यात्रेत गावगुंडांकडून भरदिवसा गोळीबार... दहशत पसरवण्याचा प्रयत्न.

 यात्रेत गावगुंडांकडून भरदिवसा गोळीबार... दहशत पसरवण्याचा प्रयत्न.


पिंपरी :
 मावळ तालुक्यात दिवसेंदिवस गुन्हेगारी वाढत असल्याचे पहायला मिळत आहे. असाच एका प्रकार समोर आला आहे. दहशत पसरविण्याच्या हेतूने मावळ तालुक्यातील चांदखेड गावात यात्रा सुरू आहे. ही यात्रा सुरू असताना एका तरुणाने मद्यधुंद अवस्थेत बंदूक काढून हवेत गोळीबार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या घटनेने यात्रेत एकच खळबळ उडाली होती. या घटनेप्रकरणी शिरगाव पोलिसांनी गोळीबार करणाऱ्या तरुणासह चार जणांना ताब्यात घेतले आहे.
अविनाश बाळासाहेब गोठे ( वय २२) , विजय अशोक खंडागळे ( वय १८) , अमर उत्तम शिंदे ( वय २२), अनिकेत अनिल पवार ( वय २६) असे अटक केलेल्या आरोपींची नावे असून त्यात एका अल्पवयीन मुलाचा समावेश आहे. अविनाश गोठे याच्यावर यापूर्वी देखील विनयभंग केल्याचा गुन्हा दाखल आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, मावळ तालुक्यातील चांदखेड येथे यात्रेचे आयोजन करण्यात आले होते. या यात्रेत मावळ तालुक्यासह इतर ठिकाणाहून देखील नागरिक यात्रेचा आनंद घेण्यासाठी आले होते. यात्रेत मोठ्या प्रमाणावर देखील गर्दी झाल्याचे पाहायला मिळाले होते. यात्रेतील गर्दीचा फायदा घेत एका गुन्हेगाराने गावात दहशत निर्माण करण्यासाठी स्वत:कडील पिस्तूल बाहेर काढले आणि हवेत गोळीबार केला. हवेत गोळीबार करत दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला. तसेच गाड्यांच्या काचा फोडल्या. कोयत्याने फ्लेक्स फाडले, सुदैवाने या घटनेत कोणीही जखमी झाले नाही. घटना स्थळवरून आरोपी पळून गेले. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी त्यांचा शोध घेत त्याला ताब्यात घेतले.

No comments:

Post a Comment