पोलिसांची मोठी कारवाई, कोयता गँगचा म्होरक्या जेरबंद. - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Friday, January 13, 2023

पोलिसांची मोठी कारवाई, कोयता गँगचा म्होरक्या जेरबंद.

पोलिसांची मोठी कारवाई, कोयता गँगचा म्होरक्या जेरबंद.
पुणे : पुणे पोलिसांनी कोयता गँगच्या विरोधात मोठी कारवाई केली आहे. पोलिसांनी कोयता गँगचा म्होरक्या बिट्ट्या कुचेकर, साहिल शेख आणि आकाश कांबळे यांना अटक केली आहे. त्यांच्याकडून दोन कोयते जप्त करण्यात आले आहेत. आतापर्यंत कोयता गँगविरोधातील ही सर्वात मोठी कारवाई मानली जात आहे.
पोलिसांनी कोंबिंग ऑपरेशन करत ही कारवाई केली आहे. कोयता गँगचे सगळे मेंबर रात्री दरोडा टाकण्याच्या तयारीत होते. त्यादरम्यान पोलिसांनी त्यांना बेड्या ठोकल्या आहेत. तिघांना आज न्यायालयात हजर करण्यात येणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली. कोयता गँगविरोधात पुणे पोलिसांनी चांगलीच कंबर कसली आहे. त्यांचं धाडसत्र सुरुच आहे. मागील दोन दिवस पुणे पोलीसांचं कोंबिंग ऑपरेशन सुरु आहे. त्यात रात्रभर पोलीस शहरातील विविध भागाची झाडाझडती करत आहेत. काल रात्रभरात ३२ जणांवर गुन्हे दाखल करत त्यांच्याकडून ३८ कोयते जप्त केले.
कोंबिंग ऑपरेशनच्या पहिल्या रात्री धाडसत्र सुरु केलं होतं. त्यात अनेक गुन्हेगारांची झाडाझडती सुरु केली आहे. त्यात शहरातील ३,७६५ गुन्हेगारांची चौकशी केली. पोलिसांनी मध्यरात्री विशेष मोहीम राबवून गुन्हेगारांची चौकशी केली. तपासात ६९८ गुन्हेगार एकाच पत्त्यावर राहत असल्याचं निष्पन्न झालं. त्यांच्याकडून पिस्तुल, काडतुसे, १४५ कोयते जप्त करण्यात आले. मागील काही दिवसांपासून पुण्यात कोयता गँगने धुमाकूळ घातला होता. शहारातील विविध भागात त्यांनी दहशत निर्माण केली होती.
पुण्यात मागील काही दिवसांपासून शहरातील हॉटेल, लॉज, एसटी बसस्थानक, रेल्वे स्थानर परिसरात पोलिसांनी शोधमोहीम राबवली होती. सिंहगड रोड पोलिसांनी धायरी परिसरात राहणाऱ्या नीलेश शिवाजी गायकवाड (वय ३५) याला अटक करुन त्याच्याकडून देशी बनावटीचे पिस्तूल आणि एक काडतूस जप्त केले होते. अवैध शस्त्र बाळगल्याप्रकरणी ४३ जणांना अटक करण्यात आली होती. त्यांच्याकडून १४५ कोयते, तलवारी अशी हत्यारे जप्त करण्यात आले होते.

No comments:

Post a Comment