जामखेड येथे फुफाटया पासुन नागरिक त्रस्त. - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Sunday, January 1, 2023

जामखेड येथे फुफाटया पासुन नागरिक त्रस्त.

 जामखेड येथे फुफाटया पासुन नागरिक त्रस्त.

नागरिकांन चे आरोग्य धोक्यात ! 


जामखेड -
जामखेड शहरातून नियोजित राष्ट्रीय महामार्ग मंजूर केलेला असून, या महामार्गावर प्रशासनाने खडडे बुजवण्याकरीता डांबराऐवजी मातीमिश्रीत मुरुम टाकला होता. पावसाळ्यात खडडे व चिखल याचा नागरीकांना सामना करावा लागला होता. हे कमी की काय म्हणून पावसाळा संपल्यानंतर याच चिखलाची आता माती झाली आहे. या रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर वाहनांची वर्दळ आहे. त्यामुळे वाहनांमुळे धुळीचे लोट उठत असून, नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. नागरीक या धुळीने त्रस्त झाले असून, नागरीकांची खड्ड्यातून फुफाट्यात पडल्यासारखी अवस्था झाली आहे.
जामखेड शहरात बस स्टॅण्ड ते खर्डा चौक हा वर्दळीचा परीसर आहे लहानमोठी वाहने याच बरोबर मोठ्या प्रमाणात माणसांची वर्दळ या ठिकाणी असते. या रस्त्याची अक्षरश: चाळणी झाली असून ये जा करणारी वाहने खड्यामध्ये आपटल्याने धुळीचे लोट ऊसळत आहेत यातूनच उडालेली धुळ व माती ही वाहन चालकांच्या डोळ्यात जात असल्याने वाहनांचा छोटा मोठा अपघातही या परीसरात होत आहे. शहरातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गाचे कामाची ठेकेदाराने काही कोटींची निविदा भरली आहे. तसेच मागील दोन महिन्यांपासून रस्त्याची मोजमाप करून घेण्यात आले होते. दिवाळीपूर्वीच कामाला सुरूवात होणार होती रस्त्याच्या बाजूला असलेले अतिक्रमण काढण्याची तयारी करण्यात आली होती. आमदार रोहित पवार यांनी याबाबत राष्ट्रीय महामार्गाचे अधिकारी ठेकेदाराचे अभियंता यांची बैठक घेऊन काही दिवसाने अतिक्रमण हटवू. असे सांगितले होते. तसेच अतिक्रमणधारकांच्या पुनर्वसन करण्यावरही चर्चा केली जाणार होती. तरी संबंधित ठेकेदाराकडून कोणतीच कारवाई होत नसल्याने राष्ट्रीय महामार्गाचे काम कधी सुरू होणार, असा प्रश्न पडला आहे. प्रशासनाने धुळ उडू नये म्हणून टँकरने रस्त्यावर पाणी मारायला सुरुवात केली आहे परंतु या गोष्टीने धुळीबाबत फारसा परिणाम होत नसल्याचे दिसत आहे. कारण मारलेले पाणी हे सुकत आहे व पुन्हा धुळ उडत असल्याने पैश्याबरोबर पाण्याचेही अपव्यय होत असलेचे नागरीकांचे मत आहे. त्यामुळे लोकप्रतिनिधींनी याकडे लक्ष देऊन ठोस उपाय योजना करून जामखेडकरांना खड्डेमुक्त व धुळमुक्त करावे अशी जनतेची भावना आहे. धुळीमुळे श्वसनाचे आजार, खोकला, दमा, घसा व डोळ्याचे विकार होत असल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. शहरातील रस्त्यालगत असलेल्या दुकानदारांनाही याचा प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे.

No comments:

Post a Comment