विवाहित आरोपीचा अविवाहित तरुणीवर बलात्कार. - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Monday, January 2, 2023

विवाहित आरोपीचा अविवाहित तरुणीवर बलात्कार.

 विवाहित आरोपीचा अविवाहित तरुणीवर बलात्कार. गुन्हा दाखल.


श्रीरामपूर -
विवाहित असताना अविवाहित असल्याचे सांगून अविवाहित तरुणीला विवाहाचे आमीष दाखवून बलात्कार करून तिचा गर्भ पाडण्यासाठी मारहाण करणार्‍या सोमेश्वर आसाराम आरगडे (टाकळीभान ता.श्रीरामपूर) या आरोपीवर पीडित तरुणीच्या फिर्यादीवरून काल श्रीरामपूर शहर पोलिसात आरोपी सोमेश्वर आसाराम आरगडे यांच्या विरुद्ध भादवि कलम 376 (2) (एन) ,323 ,504 ,506 अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंध कायदा कलमाप्रमाणे ट्रॉसिटी व बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पुढील तपास पोलीस करत आहे.
श्रीरामपूर शहर परिसरातील एका अविवाहित तरुणीला मी अविवाहित असून तुझ्याबरोबर लग्न करीन असे म्हणत वेळोवेळी ती तिच्या घरी एकटी असतांना आरोपी सोमेश्वर आसाराम आरगडे,राहणार- टाकळीभान,तालुका श्रीरामपूर याने तरुणीच्या घरी जाऊन बळजबरीने तिच्या इच्छेविरुद्ध बलात्कार केला.
वेळोवेळी लग्नाचे आमीष दाखवून बलात्कार केल्याने पीडित तरुणी गर्भवती झाली.तिला गर्भ पाडण्यासाठी आरोपी सोमेश्वर आसाराम आरगडे याने मारहाण करून शिवीगाळ करत खून करण्याची धमकी दिली.पीडित तरुणी मागास जातीची असल्याचे माहित असतानाही व आरोपी सोमेश्वर आरगडे याचे लग्न झालेले आहे व त्याला दोन मुले आहेत असे असतानाही त्याने मी अविवाहित आहे असे सांगून पीडित तरुणीवर वेळोवेळी बलात्कार केल्याची घटना घडली आहे.

No comments:

Post a Comment