चि.स्वराज सचिन गायवळ यांच्या वाढदिवसानिमित्त गोशाळेत चारा वाटप. - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Sunday, January 1, 2023

चि.स्वराज सचिन गायवळ यांच्या वाढदिवसानिमित्त गोशाळेत चारा वाटप.

 चि.स्वराज सचिन गायवळ यांच्या वाढदिवसानिमित्त गोशाळेत चारा वाटप.


जामखेड -
शिवप्रतिष्ठान हिंदुस्तान संचलित साकेश्वर गोशाळेमध्ये आज सामाजिक कार्यकर्ते सचिन सर गायवळ यांचे चिरंजीव स्वराज यांच्या जन्मदिनाचे औचित्य साधुन आपली सामाजिक बांधिलकी गोवंश जतन व संवर्धन करण्याकरिता आज एक टेम्पो  हिरवा चारा कुट्टी करून संकेश्वर गोळाळेतील गो वंशांना देण्यात आला. वाढदिवसाचा अनावश्यक खर्च टाळून गोशाळेला चारा देणे  या उपक्रमाचे कौतुक सर्व स्तरातून होत आहे.  
यावेळी प्रमुख उपस्थिती शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे अध्यक्ष पांडुरंग भोसले, जामखेड मीडिया क्लब अध्यक्ष सुदाम वराट, किशोर गायवळ , मयूर भोसले, विशाल दौंड तुषार बोथरा, शिवाजी नाना खंडागळे, आजिनाथ पुलावले आदी मान्यवर उपस्थित होते. 
यावेळी शिवप्रतिष्ठान तालुकाप्रमुख पांडुरंग भोसले यांनी गायवळ कुटुंब नेहमीच गोशाळेला सहकार्य करत आहे त्यांचे सामाजिक कार्य चांगले असून स्वराज ला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. व सर्वांनी आपला वाढदिवस गोशाळेत साजरा करावा व गायींची साठी चारा देऊन सेवा करावी असे आवाहन केले.
यावेळी किशोर गायवळ यांनी स्वराला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या व सामाजिक कार्यात गायवळ कुटुंब नेहमीच अग्रेसर राहत आहे व नवीन वर्षाच्या शुभेच्छा दिल्या. उपस्थित सर्वांनी स्वराजला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here