मुन्नाभाई डॉक्टरांचे धाबे दणाणले. बोगस डॉक्टर अंडरग्राउंड! - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Saturday, January 7, 2023

मुन्नाभाई डॉक्टरांचे धाबे दणाणले. बोगस डॉक्टर अंडरग्राउंड!

 वैद्यकीय क्षेत्रातील अनागोंदीवर सीबीआय अ‍ॅलर्ट मोडवर.

मुन्नाभाई डॉक्टरांचे धाबे दणाणले. बोगस डॉक्टर अंडरग्राउंड!


श्रीरामपूर :
वैद्यकीय क्षेत्रात सुरू अनागोंदी कारभारा संदर्भात, केंद्रीय तपास यंत्रणा सीबीआय अलर्ट मोडवर आली असून सीबीआयच्या या धडक कारवाईमुळे विविध जिल्ह्यासह मोठमोठे शहरातील मुन्नाभाई डॉक्टरांचे धाबे दणाणले असून. काही दिवसांपूर्वी काही दिवसांपूर्वी नगर जिल्ह्यातील, नेवासा फाटा येथील श्वास हॉस्पिटल मध्ये देखील. अशाच प्रकारे सुरू असल्या संदर्भात वृत्त प्रसारित केल्याने. तालुका आरोग्य यंत्रणेने, संबंधित डॉक्टर अविनाश काळे यास नोटीस बजावून. नेवासा फाटा येथील श्वास सील केलेले आहे. आता सीबीआय अलर्ट मोडवर आल्याने, विनायक मगर, अविनाश काळे सारख्या मुन्नाभाई डॉक्टरांचे धाबे दणाणले असून. सीबीआयच्या कारवाई पासून वाचण्यासाठी, अनेक बोगस डॉक्टर अंडरग्राऊंड झाले असून. सीबीआयच्या कारवाईमुळे वैद्यकीय क्षेत्रात एकच खळबळ उडालेली आहे.
विदेशात वैद्यकीय शिक्षण घेतल्यानंतर, (विदेशी चिकित्सा स्नातक परीक्षा) उत्तीर्ण होणे गरजेचे असते. मात्र सदरची परीक्षा न देता. अवैधरित्या वैद्यकीय व्यावसाय थाटून, पैशासाठी लोकांच्या जीवाशी खेळणारे डॉक्टर, आता केंद्रीय तपास यंत्रणेच्या रडारवर आल्याने. अशा डॉक्टरांवर सीबीआयने छापे घालून, त्यांच्या जवळील दस्तावेज जप्त करत, कायदेशीर कारवाई प्रस्तावित केली आहे. सीबीआयच्या कारवाईमुळे महाराष्ट्रासह अनेक राज्यांच्या 14 मेडिकल काउन्सिल्सल देखील चौकशीच्या घे-यात घेतले आले असून आत्ता पर्यंत देशभरातील 73 डॉक्टरांवर कारवाई करण्यात आली आहे.ज्यात बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर येथील डॉ. विनायक अभिमन्यू मगर यांच्या, औरंगाबाद येथील दवाखान्यावर देखील. सीबीआयने छापा टाकून येऊन, दस्तावेज व सामग्री जप्त केली आहे.

No comments:

Post a Comment