ड्युटी वरून घरी परतलेल्या आईच्या काळजाचा.. समोरील दृश्य पाहून ठोका चुकला. - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Saturday, January 7, 2023

ड्युटी वरून घरी परतलेल्या आईच्या काळजाचा.. समोरील दृश्य पाहून ठोका चुकला.

 अल्पवयीन मुलीची गळफास घेत आत्महत्या.


जळगाव :
जळगाव शहरातील शिवकॉलनी परिसरात 17 वर्षीय अल्पवयीन मुलीने राहत्या घरात गळफास घेवून आत्महत्या केल्याची घटना आली आहे. या अल्पवयीन मुलीने आत्महत्येसारखं टोकाचं पाऊल का उचललं याचा तपास पोलीस घेत आहेत. यामागील कारण अद्याप पुढे आलेलं नाही.
जळगाव शहरातील शिवकॉलनी परिसरातील ही अल्पवयीन मुलगी तिच्या आईसोबत राहत होती. अल्पवयीन मुलीची आई जिल्हा परिषदेत नोकरीला आहे. त्या नेहमीप्रमाणे ड्युटीवर गेल्या होत्या. शुक्रवारी ही अल्पवीयन मुलगी घरी एकटी असताना तिने ओढणीने गळफास घेवून आत्महत्या केली. सायंकाळी सात वाजता जेव्हा आई घरी आली तेव्हा तिच्या हृदयाचा ठोका चुकला. त्यांना त्यांची मुलगी ही गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आली. हे दृष्य पाहताच त्यांनी मोठा आक्रोश केला.
घटनेची माहिती मिळाल्यावर रामानंदनगर पोलिसांनी घटनास्थळ गाठलं. त्यांनी मृतदेह खाली उतरवून जिल्हा रुग्णालयात हलविला. याठिकाणी वैद्यकीय अधिकारी डॉ. दिपक जाधव यांनी अल्पवयीन मुलीला मृत घोषित केले.
ही अल्पवयीन मुलगी जळगाव शहरातील एका महाविद्यालयात बाराव्या वर्गात शिक्षण घेत होती. तिने आत्महत्या का केली त्याचे कारण अद्याप कळू शकलेलं नाही. याबाबत डॉ. दीपक जाधव यांच्या माहितीवरुन रामानंदनगर पोलिसांत अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस नाईक अजित पाटील हे करीत आहेत.

No comments:

Post a Comment