महिलेचा झोपेच्या गोळ्या खावून 2 लहान मुलांसह आत्महत्येचा प्रयत्न. - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Monday, January 16, 2023

महिलेचा झोपेच्या गोळ्या खावून 2 लहान मुलांसह आत्महत्येचा प्रयत्न.

 महिलेचा झोपेच्या गोळ्या खावून 2 लहान मुलांसह आत्महत्येचा प्रयत्न.


शिर्डी -
शिर्डीतील मेडिकल चालक महिलेने आपल्या दोन लहान मुलांसह झोपेच्या गोळ्या खाऊन आत्महत्येचा प्रयत्न केला. यापूर्वी महिलेने तिच्या मोबाईलवर घटनेचे स्टेट्सही ठेवले. मैत्रिणींच्या दक्षतेमुळे महिलेचे आणि तिच्या मुलांचे प्राण वाचू शकले. या घटनेने शिर्डी शहरात एकच खळबळ उडाली आहे.
महिला अनेक दिवसांपासून डिप्रेशनमधे असल्याची माहिती मैत्रीणींकडून मिळाली आहे. तिने जन्म तारखेसह मृत्यूचा स्टेटस ठेवल्याने मैत्रीणींना तिच्या आत्महत्येच्या प्रयत्नाबाबत समजले. मैत्रिणींनी संबंधित महिलेला तिच्या मुलांसह तात्काळ साईबाबा रुग्णालयात दाखल केले.
स्वतः बरोबरच दोन्ही मुलांचा जीव घेण्याचा प्रयत्नातून महिलेने झोपेच्या गोळ्या खाल्ल्याची प्राथमिक माहिती आहे. आत्महत्येचा प्रयत्न करण्यामागील कारण अद्याप अस्पष्ट आहे. महिलेचा प्रकृती स्थिर असली तरी तिच्या मुलांची प्रकृती अस्थिर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. मुलगी ईश्वरी ( वय 14 वर्षे) आणि मुलगा आदित्यला (वय 10 वर्षे) पुढील उपचारासाठी लोणी प्रवरा हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आले आहे.

No comments:

Post a Comment