नगरमधील या नगरसेवकाचे हॉटेल व संपर्क कार्यालय फोडले. - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Monday, January 16, 2023

नगरमधील या नगरसेवकाचे हॉटेल व संपर्क कार्यालय फोडले.

 नगरमधील या नगरसेवकाचे हॉटेल व संपर्क कार्यालय फोडले.पोलिसांत गुन्हा दाखल.


अहमदनगर -
नगरसेवक अक्षय सदानंद उणवने (वय 26 रा. सावेडी) यांचे हॉटेल तसेच संपर्क कार्यालयातील केबिनची तोडफोड करुन हॉटेलच्या गल्ल्यातील पाच हजार 400 रुपये रक्कम चोरून नेण्यात आले आहे. शनिवारी सायंकाळी सहा वाजता येथील सारडा कॉलेजजवळ ही घटना घडली. या प्रकरणी नगरसेवक अक्षय उणवने यांनी तोफखाना पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
दिलेल्या फिर्यादीवरून संदीप रघुनाथ घोरपडे (रा. डॉनबॉस्को, सावेडी) याच्याविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नगरसेवक उणवने यांचे सारडा कॅन्टीन (हॉटेल) आहे. तेथेच त्यांचे संपर्क कार्यालय आहे. त्यांनी ते शनिवारी सकाळी सात वाजता उघडले होते. दिवसभर हॉटेलमधील गल्ल्यात पाच हजार 400 रुपये जमा झाले होते. हॉटेल व संपर्क कार्यालय सायंकाळी सहा वाजेपर्यंत सुरू होते. दरम्यान उणवने यांना सायंकाळी कामानिमित्त बाहेर जावे लागले तेव्हा त्यांनी हॉटेल व संपर्क कार्यालय सहा वाजता बंद केले. ते काम झाल्यानंतर पुन्हा साडे सहा वाजता आले असता त्यांना शटरचे कुलूप तुटलेले दिसले. त्यांनी आत पाहणी केली असता सीसीटीव्ही स्क्रिनची व केबिनची तोडफोड केलेली दिसली.
हॉटेलच्या काउंटरचे लॉक तोडून पाच हजार 400 रुपयांची रोख रक्कम चोरीला गेल्याचे दिसले. नगरसेवक उणवने यांनी चौकशी केली असता संदीप घोरपडे याने हे कृत्य केल्याची त्यांना माहिती मिळाली. यांनी तोफखाना पोलिसांत गुन्हा दाखल केला असून पोलीस अधिक तपास करीत आहेत.

No comments:

Post a Comment