बायकोला नांदायला पाठवत नाही म्हणून जावयाने केला सासऱ्याचा खून.. - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Saturday, January 14, 2023

बायकोला नांदायला पाठवत नाही म्हणून जावयाने केला सासऱ्याचा खून..

बायकोला नांदायला पाठवत नाही म्हणून जावयाने केला सासऱ्याचा खून..


सांगली : 
बायकोला नांदवायला पाठवत नाही, म्हणून जावयाने सासऱ्याचा चक्क खून केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. सांगलीच्या जत तालुक्यातील दरीबडची इथे हा प्रकार घडला आहे. आप्पासो मल्लाड असं मृत सासऱ्याचं नाव आहे. याप्रकरणी जावयासह चार जणांविरोधात जत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जत तालुक्यातील आप्पासो पाटील यांची मुलगी तेजश्रीने दीड वर्षांपूर्वी कर्नाटकमधील अथणी तालुक्यातील एगळी गावातल्या एका तरुणाशी लग्न केलं होतं. सचिन बळोळी असं त्या तरुणाचं नाव होतं. मात्र लग्नानंतर या दोघांमध्ये वाद सुरू झाले. घरगुती वादामुळे गेल्या सहा महिन्यांपासून तेजश्री आपल्या माहेरी सांगतीत राहत आहे. या दोन पती-पत्नींमधील वाद वाढला असून तरुणीने घटस्फोटासाठी जत न्यायालयात अर्ज दाखल केला आहे.
पण तिच्या पतीचा घटस्फोट देण्यास नकार आहे. तिचा पती सचिन बळोळीने घटस्फोट देत नसल्याचं सांगत पत्नीला नांदायला पाठवा, अशी मागणी वारंवार पत्नीच्या माहेरच्या मंडळींकडे केली होती. पण सासरे आप्पासो मल्लाड हे आपल्या बायकोला नांदायला पाठवत नाही, असा समज जावई सचिन बळोळी यांच्या मनात निर्माण झाला होता.
या रागातूनच शुक्रवारी रात्रीच्या सुमारास सचिन बळोळीने आपला भाऊ मिलन बळोळी आणि इतर दोघांसह कट रचला. दरीबडीची इथे त्याचे सासरे उसाच्या शेतात काम करत होते. या तिघांनी एकत्र भेटून उसाच्या शेतात काम करत असलेल्या सासरे आप्पासो मल्लाड यांच्यावर धारदार शस्त्रांनी वार करून त्यांची निर्घृण हत्या केली. सासऱ्यांची हत्या केल्यानंतर जावई फरार झाला असून या प्रकरणी जत पोलीस ठाण्यामध्ये सासऱ्याच्या हत्या प्रकरणी जावयासह चौघांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.

No comments:

Post a Comment