शेअर बाजारात पैसे गमावल्यामुळे एकाच कुटुंबातील चौघांची आत्महत्या.. - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Saturday, January 14, 2023

शेअर बाजारात पैसे गमावल्यामुळे एकाच कुटुंबातील चौघांची आत्महत्या..

 शेअर बाजारात पैसे गमावल्यामुळे एकाच कुटुंबातील चौघांची आत्महत्या..


पुणे - 
पुण्यातील केशवनगर परिसरात एकाच कुटुंबातील चौघांनी विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केल्याचा प्रकार उघडकीस आला. पती दीपक थोटे (५९), पत्नी इंदू थोटे (४५), मुलगा ऋषिकेश (२१), मुलगी समीक्षा (१७) अशी आत्महत्या केलेल्या चौघांची नावे आहेत. मूळचे ते अमरावती येथील रहिवासी असून २ महिन्यांपूर्वी पुण्यात केशवनगरात वास्तव्यास आले होते. दीपक थोटे हे सुरक्षा रक्षक म्हणून काम करत होते. पत्नी इंदू या गृहिणी होत्या. मागील काही दिवसांपासून दांपत्याने शेअर मार्केटमध्ये रक्कम गुंतवली होती. मात्र, त्यांना तोटा झाल्यामुळे कुटुंब आर्थिक तणावात होते. त्यामुळे त्यांनी आत्महत्या करण्यापूर्वी मुलगा आणि मुलीला विषारी औषध पाजले. नंतर पती-पत्नी यांनीही विष पिऊन आत्महत्या केल्याचा अंदाज पोिलसांनी वर्तवला आहे.


No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here