सत्यजित ताबेंचा बिनविरोध विजयाचा मार्ग खडतर.. - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Saturday, January 14, 2023

सत्यजित ताबेंचा बिनविरोध विजयाचा मार्ग खडतर..

 सत्यजित ताबेंचा बिनविरोध विजयाचा मार्ग खडतर..

अपक्ष उमेदवार शुभांगी पाटील यांना महाविकास आघाडीचा पाठिंबा.


नाशिक -
नाशिक पदवीधर मधून एैनवेळी अपक्ष उमेदवारी अर्ज भरणारे सत्यजित तांबे यांना कुठल्याही परिस्थितीत बिनविरोध निवडून येवू नये यासाठी महाविकास आघाडी भाजपच्या खेळीला चेकमेट देणार असल्याचे संकेत मिळत आहेत. सत्यजित ताबेंना फुस लावणार्‍या भाजपच्या अपक्ष उमेदवार शुभांगी पाटील शिवसेनेच्या गळाला लागल्या आहेत. ही निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता वर्तविण्यात येत होती. मात्र, आता या निवडणुकीत शुभांगी पाटील यांना महाविकास आघाडीने पाठिंबा व्यक्त केल्याने चुरस निर्माण झाली आहे.
नाशिक पदवीधर निवडणुकीतील अपक्ष उमेदवार शुभांगी पाटील यांनी मातोश्रीवर जात उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. महाविकास आघाडीच्या बैठकीनंतर लगेच शुभांगी पाटील यांनी मातोश्री गाठल्याने शिवसेना मोठा डाव टाकण्याच्या तयारीत असल्याचे हे संकेत मानले जात आहेत.
खासदार संजय राऊत यांनी ही निवडणूक बिनविरोध होणार नाही असे सांगितले होते. त्यानंतर महाविकास आघाडीच्या नेत्यांची आज मातोश्री येथे उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत बैठक झाली. या बैठकीत शुभांगी पाटील यांना पाठिंबा देण्याचा निर्णय झाला आहे.


No comments:

Post a Comment