अजित पवारांबाबत भाजपनं राजकारण केलं : रोहित पवार. - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Thursday, January 5, 2023

अजित पवारांबाबत भाजपनं राजकारण केलं : रोहित पवार.

 अजित पवारांबाबत भाजपनं राजकारण केलं : रोहित पवार.


पुणेः
छत्रपती संभाजी महाराज यांच्यावर वादग्रस्त वक्तव्य केल्यानंतर अजित पवार यांच्यावर अनेकांनी टीका केली. तसेच राजीनामा देखिल मागितला गेला. त्यावर आता राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार आपली प्रतिक्रीया दिली आहे. तसेच अजित पवारांबाबत भाजपनं राजकारण केल्याचा आरोपही रोहित पवार यांनी केला.
तसेच महापुरुषांबद्दल अवमानकारक वक्तव्य करणार्‍या भाजप नेत्याविरोधात भाजपच गप्प आहे. त्याबद्दल ते काहीच बोलले नाहीत. मात्र अजित पवार यांच्याविरोधात उगाचच राजकारण केलं जातंय. त्याचबरोबर रोहित पवार म्हणाले, ’पूर्वी छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले, कर्मवीर भाऊराव अण्णा यांच्याबद्दल भाजपच्या नेत्यांनी तर राज्यपालांनी देखिल वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. त्यावर मात्र लोक गप्प बसले. आणि आता अजित पवारांच्या वक्तव्यावर राजकारण केलं जात आहे. असंही रोहीत पवार म्हणाले.No comments:

Post a Comment