सावधान मोबाईलचा अतिवापर टाळा....अति वापराने होत आहेत हे आजार. - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Thursday, January 5, 2023

सावधान मोबाईलचा अतिवापर टाळा....अति वापराने होत आहेत हे आजार.

 सावधान मोबाईलचा अतिवापर टाळा....अति वापराने होत आहेत हे आजार.


नगरी दवंडी प्रतिनिधी

अहमदनगर- मोबाईल फोनद्वारे जे एश्रशलीीें ारसपशींळल ीरवळरींळेप निघतात. त्याचा शरीरावर फार मोठा दुष्परिणाम होतो. विशेषत: लहान मुलांसाठी हे कळसह ऋीर्र्शिींशपलू एश्रशलीीें चरसपशींळल षळशश्रव मेंदूसाठी व रक्तासाठी फारच हानिकारक असतात. याच्या अतिरेकी वापरामुळे डोकेदुखी, टेंशन, निद्रानाश व कानाच्या पडद्यावर वाईट परिणाम होतो.

सध्या मोबाइल हा जणू आयुष्याचाच अविभाज्य भाग असल्यासारखे आपण सर्व जण वागत असतो. संपर्क साधण्यापासून ते मनोरंजनापर्यंत या मोबाइलवर प्रत्येक जण अवलंबून असल्याचं चित्र सर्वत्र पाहायला मिळतं. पण कधी विचार केला आहे का की, या मोबाइलचे जितके फायदे आहेत त्याहून अधिक तोटे देखील आहेत. या मोबाइलच्या अतिवापरामुळे तरुण वयातच अनेकांना कानांचे, डोळयांचे अनेक आजार झालेले त्यामुळे पाहायला मिळतात. मोठयांपासून ते लहान मुलांपर्यंत सारेच जण याच्या अधीन होत चालले आहेत.

सुसंवादाची कमी : प्रत्यक्ष संवाद हा सगळ्यात उत्तम! समोरासमोर बसून संवाद साधल्याने संबंध चांगले राहतात,तसेच कुठल्याही समस्येचे निवारण लवकरात लवकर होते. पण, आजकाल मोबाईलच्या अतिरेकी वापरामुळे संवाद हा फारच कमी झालेला आहे. प्रवासात पण जेव्हा सगळे ग्रुपनी जातात,तेव्हा गप्पागोष्टींपेक्षा सगळेजण मोबाईलवरच व्यस्त असतात.

शारीरिक हालचाली कमी :

मोबाईलमुळे सगळ्यांच्या शारीरिक हालचाली कमी झाल्या आहेत. तसेच, आळशीपणा पण वाढला आहे. शेजारच्या दुकानातून सामान आणायचे असल्यास फोन करून होमडिलीव्हरी द्वारे सामान मागविल्या जाते. अशा प्रकारे आळशीपणाचे जे दुष्परिणाम असतात, त्याद्वारे नुकसानच होते.

अतिरेक झोपेचे प्रमाण :

मोबाईल रेडिएशनचा वेग हा 884 चह 2 इतका असतो, त्यामुळे झोपेचे प्रमाण हे वाढतच जातं. जास्त झोपण्यामुळे कामे वेळेवर पूर्ण होत नाही, तसेच संपूर्ण शरीरावर पण घातक परिणाम होतो.

एकाग्रतेचा अभाव :

सेलफोनच्या अति वापरामुळे एकाग्रतेचा अभाव आढळून येतो. शारीरिक तसेच मानसिक पण ताण पडतो. मुले अभ्यास करताना सुद्धा मोबाईलवर गेम खेळत असतात व ळपींशीपशीं चा वापर करतात. त्यामुळे मुलांचे नापास होण्याचे प्रमाण हे वाढतच आहे.

ब्रेन ट्युमर :

सेलफोनचे जे शश्रशलीीेांरसपशींळल रेडिएशन निघतात. त्याचा सर्वात वाईट परिणाम आपल्या ब्रेनवर होतो. शास्त्रज्ञांनी केलेल्या संशोधनानुसार अतिरेकी वापरामुळे ब्रेन ट्युमर होण्याची शक्यता असतो.

शरीराच्या तापमानात वाढ :

मोबाईल फोनमध्ये रेडिओ षीर्र्शिींशुपलळ शी चा बेस स्टेशनशी संवाद साधण्यासाठी वापर केला जातो.या रेडिएशनमुळे शरीराच्या तापमानात अतिरिक्त वाढ होते, त्याचा वाईट परिणाम आपल्या ब्रेन व शरीरावर होतो.

अपघाताच्या प्रमाणात वाढ :

सेलफोनच्या अतिरेकी वापरामुळे रोड अपघातात दिवसेंदिवस वाढ होत आहे. नियम कितीही कडक केले तरीपण लोक ड्रायव्हिंग करताना सेलफोनवर बोलत असतात, त्यामुळे त्यांचे लक्ष विचलित होते व अपघाताच्या प्रमाणात वाढ होते.

तोंडाचा ट्युमर वाढण्याची शक्यता :

नुकत्याच झालेल्या मेडिकल सर्वेनुसार सेलफोनच्या अतिरेकी वापरामुळे र्ोीींह लरपलशी ची शक्यता वाढते. त्यामुळे खूप आवश्यक असेल तेव्हाच फोनचा वापर करावा.

गॅजेट्सच्या सतत वापराचा परिणाम आपल्या आरोग्यावर अनेक प्रकारे होऊ शकतो.गॅजेट्सच्या आहारी गेल्याने निद्रनाशासारखे त्रास जाणवू लागल्याचे आपण अनेकदा ऐकत असतो, पण या गॅजेट्स मुळे आपल्या शरीरावरही अनेक प्रकारचे दुष्परिणाम होत असतात, याचा विचारकरणेही अगत्याचे आहे.काही व्यक्तींना मोबाईल किंवा कॉम्प्यूटरच्या स्क्रीनकडे पाहताना सतत डोळे बारीक करून पाहण्याची सवय असते. त्यामुळे डोळ्यांच्या अवतीभोवती सुरकुत्या पडू लागतात, तसेच डोळ्यांवरही सतत ताण जाणवू लागतो.त्यामुळे स्क्रीनकडे बघताना डोळे बारीक करून बघणे टाळावे. कॉम्प्युटर किंवा मोबाईल आपल्या शरीराच्या खूप जवळ ठेवणे हे टाळावे.

या गॅजेट्स मधून बाहेर पडणारे रेडियोमॅग्नेटिक किरण आपल्या शरीरासाठी हानिकारक असतात. तसेच कॉम्प्युटर किंवा मोबाईल स्क्रीन मधील अल्ट्रा व्हायोलेट किरणांमुळे त्वचा आणि डोळे या दोहोंना अपाय होऊ शकतो.आपण वाचत आहात माहिती सेवा ग्रूप पेठवडगावची पोस्ट कॉम्प्युटर वर काम करताना आपण वापरतो ती खुर्ची आरामदायक असेल असे पहावे. काही व्यक्तींना दिवसभर कॉम्प्युटरवर काम करावे लागते, त्यांनी या गोष्टीची विशेषकाळजी घ्यावी. खुर्ची बसण्यास आरामदायक नसेल, तर त्याचा ताण पाठीच्या मणक्यांवर जाणवायला लागून, पाठदुखीचा त्रास सुरु होऊ शकतो. तसेच सतत बसून काम केल्याने पायांकडे होणारे रक्ताभिसरण व्यवस्थित न होऊन, पायांवर सूज येऊ लागते. असे होऊ नये म्हणून थोड्या थोड्या वेळाने जरासे पाय मोकळे करण्यासाठी ऑफिस मधेच किंवा घरातल्या घरात पायी चालावे,किंवा लिफ्ट ऐवजी जिन्यांचा वापर करावा.अनेक व्यक्तींना मोबाईल फोन खांद्याच्या व कानाच्या मध्ये धरून, एकीकडे काम करत बोलण्याची सवय असते. अश्या पद्धतीने जास्त वेळ बोलत राहिल्यास मानेचे दुखणे उद्भवू शकते. तसेच कॉम्प्युटरवर खाली मान झुकवून काम करीत असल्यासही मानदुखीचा त्रास उद्भवू शकतो. त्यामुळे कॉम्प्युटरचा स्क्रीन नेहमी आपल्या डोळ्यांसमोर असेल अश्या पद्धतीने ठेवायला हवा.

No comments:

Post a Comment