मित्रावर चाकूने वार करून आरोपी मित्र फरार.. - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Monday, January 9, 2023

मित्रावर चाकूने वार करून आरोपी मित्र फरार..

 मित्रावर चाकूने वार करून आरोपी मित्र फरार..


बीड :
बीड जिल्ह्यात नेहमीच छोट्या-छोट्या वादांना मोठं स्वरूप आलेलं पाहायला मिळतं आणि यातच निर्माण होतो तो रक्तरंजित खेळ. अशातच काल रविवारी जागेच्या वादातून एका तरुणास मारहाण करून चाकूने भोसकण्याची घटना रविवारी रात्री तहसील कार्यालयासमोर घडली आहे. तरुण गंभीर जखमी असून त्याला तात्काळ जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आला आहे. रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची पोलिसांची प्रक्रिया सुरू होती.
बीड शहरातील तहसील कार्यालयासमोर रविवारी रात्री प्रद्युमन गोकुळ पवार वय वर्षे 24 यास मारहाण झाली. त्यानंतर समोरच्या व्यक्तीने पवार यांच्या पोटावर चाकूने वार केले. यामध्ये पवार यांच्या डाव्या बरगडीला गंभीर दुखापत झाली आहे. त्यांना तात्काळ जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाल्याने डॉक्टरांनी ऑपरेशन करण्याचा निर्णय घेतला.
दरम्यान, सदरील वाद विक्रीच्या जागेच्या कारणावरून झाल्याचे सांगण्यात येत आहे. या प्रकरणातील मारेकर्‍याच्या अटकेसाठी पोलीस रवाना झाले असून आरोपी फरार असल्याची माहिती आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी बीडमध्ये बॉण्ड विक्रीचा व्यवसाय करत होते. गेल्या काही दिवसांपासून या दोघांत जागेवरून किरकोळ वाद सुरू होता. मात्र, काल रविवारी सुट्टी असून देखील हे दोघे तहसील भागात आले. यानंतर शाब्दिक वाद थेट रक्तरंजित चाकू खोपोसण्यापर्यंत पोहोचला. सध्या पोलीस प्रशासन आरोपीचा तपास करत असल्याची माहिती देण्यात आली आहे.


No comments:

Post a Comment