नागरिकांच्या सकारात्मक विचारातूनच गोरेगावसारखी गावे तयार होतील ः माने - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Tuesday, January 31, 2023

नागरिकांच्या सकारात्मक विचारातूनच गोरेगावसारखी गावे तयार होतील ः माने

 नागरिकांच्या सकारात्मक विचारातूनच गोरेगावसारखी गावे तयार होतील ः माने

ग्रामपंचायतीला नुकतीच पारनेर पंचायत समितीचे गटविकासाधिकारी किशोर माने यांची भेट.


नगरी दवंडी/प्रिंतनिधी
पारनेर ः गोरेगावच्या लोकनियुक्त सरपंच सौ. सुमन तांबे, मा.सरपंच राजाराम नरसाळे,उपसरपंच अण्णा पाटील नरसाळे यांनी त्यांचे स्वागत केले.मा.सरपंच मीराताई नरसाळे,गोरेश्वर पत संस्थेचे चेअरमन बाजीराव पानमंद, मा. उपसरपंच पै. दादाभाऊ नरसाळे, सेवा सोसायटीचे संचालक साहेबराव नरसाळे, मा. ग्रा. सदस्य संपत नरसाळे, सबाजी शेरकर आदींची प्रमुख उपस्थिती होती.
नागरिकांच्या सकारात्मक विचारातूनच मॉडेल व्हिलेज गोरेगावसारखी गावे तयार होतील असे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले.घरपट्टी, पाणीपट्टी वसुली, सांडपाणी व्यवस्थापण, कुशल, अकुशल कामांची त्यांनी माहिती घेतली.शासन स्तरावर चालणार्‍या सर्व योजनांची त्यांनी या प्रसंगी माहिती दिली. तुम्ही तयारी दर्शवा, योजनांसाठी लागणारी पूर्तता करा सर्व कामे मार्गी लावू असा विश्वास त्यांनी सरपंच,उपसरपंच यांना दिला.छत्रपती शिवाजी महाराज या वातानुकूलित सभागृहात झालेल्या या बैठकीत त्यांनी गोरेगाव ग्रामपंचायत च्या कामांचे विशेष कौतुक केले.
उपसरपंच आण्णा पाटील नरसाळे यांनी विहिरींची प्रकरणे लवकरात लवकर मंजूर करून द्यावी अशी त्यांना विनंती केली.
गावातील ग्रामस्थांच्या सहकार्यातून आणि मा.सभापती बाबासाहेब तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही गोरेगावचा कायापालट करू शकलो असे ग्रामस्थांप्रति गौरवोद्गार सरपंच सौ.तांबे यांनी काढले.
या प्रसंगी विजय नरसाळे सर,बाबासाहेब काकडे,शिवाजी शेरकर,विठ्ठल नरसाळे,रामदास तांबे,भगवान तांबे,ग्रामविकास अधिकारी भरत जाधव,दयानंद खेनट,भाऊसाहेब तांबे,राहुल तांबे,आदींची उपस्थिती होती.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार संदीप तांबे यांनी केले.

No comments:

Post a Comment