पोखरीकरांचे उपोषण अखेर मागे ! - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Tuesday, January 31, 2023

पोखरीकरांचे उपोषण अखेर मागे !

 पोखरीकरांचे उपोषण अखेर मागे !

सभापती काशिनाथ दाते, राहुल शिंदे बसले होते उपोषणकर्त्यांबरोबर !


नगरी दवंडी/प्रिंतनिधी
पारनेर ः येथील श्री रंगदास स्वामी देवस्थान ट्रस्ट येथील मंदिरात दि. 21 नोव्हेंबर 2022 पासून गावातील शकुंतला किसन खैरे, लतिफ फत्तु पटेल, विनोद मारुती खैरे असे विविध मागण्यांसाठी उपोषणाला बसले आहेत. त्यांच्या उपोषणातील मागणी बाबत तहसीलदार शिवकुमार आवळकंठे यांनी पूर्ण करणे करता कार्यवाही केलेली आहे. तरीही उपोषणकर्त्यांनी आडमुठी भूमिका घेऊन गावास वेठीस धरण्याचा प्रयत्न चालू केला आह पोखरी गावचा सालाबाद प्रमाणे 2 फेब्रुवारी 2023 पासून श्री रंगदास स्वामींचा यात्रा उत्सव सुरू होत आहे. या यात्रेच्या निमित्ताने मंदिरात साफसफाई करणे असून यात्रेचे नियोजनही तयार करावयाचे आहे. परंतु उपोषण कर्ते यामध्ये अडथळा निर्माण करत आहे. उपोषण करणारे शाकुंतला किसन खैरे, लतीफ फत्तु पटेल, विनोद मारुती खैरे यांना ट्रस्टचे उपाध्यक्ष राजू रखमा पवार व सचिव बाळू पांडुरंग खैरे यांनी मंदिर खाली करून आपण दिलेल्या पत्राप्रमाणे ग्रामपंचायत कार्यालय समोर उपोषण करण्याची विनंती केली. परंतु उपोषणकर्त्यांनी उलट उपाध्यक्ष व सचिव यांनाच ट्रॉसिटी चा गुन्हा दाखल करण्याची धमकी दिली आहे.
त्यांच्याविरोधात पोखरी गावातील 200 ते 250 लोकांनी पारनेर तहसील कार्यालय समोर उपोषण सुरू केले व मंदिर मोकळे करणे करिता पारनेर पोलीस ठाण्यात उपोषणकर्त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.
दुपारी 1 वाजता जिल्हा परिषदेचे बांधकाम व कृषी समिती माजी सभापती काशिनाथ दाते सर, राहुल पाटील शिंदे व सुभाष दुधाडे उपोषण स्थळी तहसील कार्यालय समोर दाखल झाले. व उपोषणास पाठिंबा देऊन उपोषणकर्त्यांसमवेत बसले. तहसीलदार शिवकुमार आवळकंठे यांनी काशिनाथ दाते सर, राहुल शिंदे, सुभाष दुधाडे व देवस्थान ट्रस्टचे पदाधिकार्‍यांना चर्चेस बोलावले. प्रांताधिकारी सुधाकर भोसले यांना राहुल पाटील शिंदे यांनी सर्व हकीगत सांगितल्याने तेही पारनेरला तहसील कार्यालय हजर झाले. राहुल पाटील शिंदे यांनी पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, खा. सुजय दादा विखे यांच्याशी संपर्क करून उपोषणाची कल्पना दिली व खासदार सुजय विखे यांनी प्रशासनास तातडीने दखल घेणे सांगितले. सभापती काशिनाथ दाते सर, राहुल शिंदे, पारनेर नगरपंचायतीचे नगराध्यक्ष विजय औटी, तहसीलदार शिवकुमार आवळकंठे, पी. आय. घनश्याम बळप यांनी चर्चा करून मंदिरात उपोषणास बसलेल्या वर कारवाई करण्याचे ठरवले व त्यांच्यावर गुन्हा दाखल करून घेतला. दुपारी 4.30 वा. माजी उपाध्यक्ष सुजित झावरे उपोषण स्थळे दाखल झाले त्यांनीही भ्रमणध्वनीवर खासदार सुजय विखे यांच्याशी संपर्क केला. उपोषणास शिवसेना तालुकाप्रमुख डॉ. श्रीकांत पठारे, शहर प्रमुख निलेश खोडदे, नगरसेवक भाऊ ठुबे, ऋषि गंधाडे यांनीही उपस्थितीत राहून पाठिंबा दिला.
यावेळी सरपंच सतीश पवार, माजी सरपंच सोपान फडतारे, परसराम शेलार, आण्णा पवार, उपसरपंच सिताराम केदार, उपाध्यक्ष राजू पवार, सचिव बाळासाहेब शिंदे, निजाम पटेल, जयश्री शिंदे, बाळु पवार, किसन धुमाळ, अशोक खैरे, पंकज कारखिले, अमोल पवार, अशोक आहेर, दत्ता शिंदे, महादू पवार, नामदेव करंजेकर, रोहिदास शिंदे, शांताराम आहेर, दिलीप शिंदे, लहानू करंजेकर, रावसाहेब शिंदे, बाबाजी वाकळे, पप्पू करंजेकर, सुधाकर शिंदे, सचिन पवार, कारभारी शिंदे, रोहिदास शिवले, बबन शिवले, गणपत शिंदे, सविता पवार फरतारे, यांसह पोखरी गावचे भजनी मंडळ मंदिर ट्रस्टचे सर्व संचालक व पोखरी गावचे नागरिक व महिला उपस्थितीत होते.

No comments:

Post a Comment