वाढदिवसाच्या खर्चाला फाटा देत जिल्हा परिषद शाळेला एलईडी टीव्ही सप्रेम भेट. - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Tuesday, January 31, 2023

वाढदिवसाच्या खर्चाला फाटा देत जिल्हा परिषद शाळेला एलईडी टीव्ही सप्रेम भेट.

 वाढदिवसाच्या खर्चाला फाटा देत जिल्हा परिषद शाळेला एलईडी टीव्ही सप्रेम भेट.


नगरी दवंडी/प्रिंतनिधी
आष्टी ः आष्टी तालुक्यातील घोंगडेवाडी येथील अमोल घोंगडे,यांनी आपल्या वाढदिवसानिमित्त जिल्हा परिषद प्राथमिक शाळेला 32 इंची एलईडी टीव्ही सप्रेम भेट दिली. खेड्यातील  मुलांमध्ये शिक्षण वाचन संस्कृती वाढावी व यात कायम सातत्य राखावे यासाठी अमोल घोंगडे, यांनी त्यांच्या वाढदिवसानिमित्त जिल्हा परिषद शाळा घोंगडेवाडी या शाळेला 32 इंची एलईडी टीव्ही दिली.
घोंगडेवाडी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत अमोल नवनाथ घोंगडे, यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला.
यावेळी हिंगणे सर, थोपटे मॅडम, घोंगडेवाडी चे सरपंच, उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य शिक्षण व्यवस्थापन समिती अध्यक्ष, उपाध्यक्ष, तसेच घोंगडेवाडी ग्रामस्थ उपस्थित होते.
अमोल घोंगडे, यांनी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेला 32 इंची एलईडी,  आई वडिलांच्या हस्ते भेट दिली. घोंगडेवाडी ग्रामस्थांनी अमोल घोंगडे, यांचे कौतुक केले.

No comments:

Post a Comment