रिक्षा दाखवण्याच्या बहाण्याने निर्जन स्थळी नेऊन तरुणीवर बलात्कार.. - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Tuesday, January 31, 2023

रिक्षा दाखवण्याच्या बहाण्याने निर्जन स्थळी नेऊन तरुणीवर बलात्कार..

रिक्षा दाखवण्याच्या बहाण्याने निर्जन स्थळी नेऊन तरुणीवर बलात्कार..


नवी मुंबई:
पनवेलमध्ये एक धक्कादायक घटना समोर आली असून या घटनेने संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे. पनवेल स्थानकाच्या परिसरातून एका २० वर्षीय तरुणीला धमकावून तिच्यावर बलात्कार करण्यात आल्याचा प्रकार उघड झाला आहे. ही तरुणी खोपोली येथील हॉटेलमध्ये कामाला आहे. ती २९ जानेवारी म्हणजे रविवारी पहाटे कामावरुन घरी परतत होती. ती पनवेलच्या करंजाळे येथे वास्तव्याला आहे. कामावरुन सुटून ती साधारण पहाटे दोनच्या सुमारास पनवेलमध्ये आली. ती घरी जाण्यासाठी रिक्षा शोधत असताना दोन अनोळखी तरुण त्याठिकाणी आले. या तरुणांनी महिलेला रिक्षा हवी आहे का, असे विचारले. तिने होकार दिल्यानंतर तरुणांनी तिला आपल्यासोबत येण्यास सांगितले. काही अंतरावर निर्जनस्थळी गेल्यानंतर दोन्ही तरुणांनी या तरुणीला धमकावून त्यांच्यासोबत येण्यास भाग पाडले.
यानंतर हे तरुण या मुलीला न्यू पनवेल येथील पंचशील नगर झोपडपट्टीच्या परिसरात घेऊन गेले. दोघांनी तिला याठिकाणी असणाऱ्या एका पडक्या इमारतीच्या टेरेसवर नेले. याठिकाणी दोघांनी तिच्यावर अत्याचार केले. या प्रकाराची वाच्यता केल्यास तुला जीवे मारून टाकू, अशी धमकीही दिली. यानंतर ही दोन्ही मुले येथून पसार झाली. यानंतर ही तरुणी पडक्या इमारतीमधून निघून थेट पोलीस ठाण्यात गेली आणि झाला प्रकार पोलिसांना सांगितला. यानंतर पोलिसांनी तातडीने तपासाला सुरुवात केली.
ही पडीक इमारत अंधाऱ्या परिसरात आहे. या इमारतीमध्येही लाईट नव्हते. त्यामुळे पोलिसांनी आजुबाजूच्या परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले. यामध्ये पोलिसांना दोन तरुणांच्या संशयास्पद हालचाली दिसल्या. त्याआधारे पोलिसांनी तरुणीवर अत्याचार करणाऱ्या एका नराधमाला ताब्यात घेतले आहे. आता पोलीस दुसऱ्या तरुणाचा शोध घेत आहेत. मात्र, या घटनेमुळे पनवेलमध्ये एकच खळबळ उडाली आहे. परिसरात काहीसे भीतीचे वातावरणही पसरले आहे.

No comments:

Post a Comment