सत्यजित तांबे यांच्या भाजप प्रवेश बाबत.. किरण काळेनी केले हे वक्तव्य. - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Wednesday, January 11, 2023

सत्यजित तांबे यांच्या भाजप प्रवेश बाबत.. किरण काळेनी केले हे वक्तव्य.

 सत्यजित तांबे यांच्या भाजप प्रवेश बाबत.. किरण काळेनी केले हे वक्तव्य.


अहमदनगर :
नाशिक पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीचा उमेदवारी अर्ज भरण्याचा उद्याचा शेवटचा दिवस आहे. या मतदारसंघात सलग तीन वेळा काँग्रेसचा उमेदवार विजयी झाला आहे. काँग्रेसचाच उमेदवार चौथ्यांदा विक्रमी मतांनी विजयी होईल, असा विश्वास शहर काँग्रेस जिल्हाध्यक्ष किरण काळे यांनी व्यक्त केला आहे. दरम्यान, सत्यजित तांबे हे भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याच्या बातम्या खोडसळ असून जाणीवपूर्वक भाजपकडूनच या बातम्या पेरल्या जात असल्याचे काळे यांनी म्हटले आहे. 
काळे म्हणाले की, विधिमंडळ काँग्रेस पक्ष नेते आ. बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली जिल्ह्यातील सर्व कार्यकर्ते काम करतात. सत्यजित तांबे यांना एनएसयुआय तसेच युवक काँग्रेसमध्ये प्रदेशाध्यक्ष पदाची मोठी संधी दिली आहे. त्याचबरोबर जिल्हा परिषदेला दोन वेळा ते सदस्य राहिले आहेत. राहुल गांधींच्या महाराष्ट्र दौऱ्यावेळी देखील त्यांच्यावर मोठी जबाबदारी सोपवण्यात आली होती. पक्ष त्यांना वेळोवेळी महत्त्वाची जबाबदारी देत आला आहे आणि भविष्यात देखील देत राहील. आ. थोरात आणि काँग्रेस पक्षाने त्यांना आजवर भरभरून दिले आहे. त्यामुळे ते नाराज असल्याचा प्रश्नच उद्भवत नाही.
डॉ.सुधीर तांबे हे तीन टर्म काँग्रेसच्या वतीने आमदार आहेत. त्यांनी चांगले काम केले आहे. दुर्गाताई तांबे देखील सक्षमपणे यशस्वी नगराध्यक्ष म्हणून काम करत आहेत. आ.थोरात यांच्या नेतृत्वाखाली तांबे परिवाराने सहकारामध्ये देखील काम केले आहे. त्यामुळे सत्यजित तांबे नाराज असल्याच्या खोट्या बातम्या भाजपकडून जाणीवपूर्वक पेरल्या जात आहेत. आ.थोरात, तांबे हे काँग्रेसचे महाराष्ट्रातील निष्ठावान कुटुंब आहेत. पक्ष अडचणीच्या काळात असताना आ.थोरात यांनी महाराष्ट्रात काँग्रेसला मोठे करण्याचे काम केले असल्याचे काळे यांनी म्हटले आहे. 
भाजपमध्ये मूळ भाजपवासीयांना अजिबात महत्त्व नाही. केवळ काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेतून लोकांना आयात करण्याचे काम केले जाते. त्यांना आयते नेतृत्व हवे असते. मात्र आ. थोरात यांच्या नेतृत्वाखाली अहमदनगर शहर आणि जिल्ह्यातील काँग्रेस भक्कम आणि अभेद्य आहे, असे काळे यांनी भाजपवर टीका करताना म्हटले आहे. 

No comments:

Post a Comment