कोयता गॅंगची दहशत कायम या उद्योजक कुटुंबीयांना लुटले. - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Wednesday, January 11, 2023

कोयता गॅंगची दहशत कायम या उद्योजक कुटुंबीयांना लुटले.

नगर-पुणे महामार्गावर कोयता गँगची दहशत. 


अहमदनगर -
नगर मधील धन्यकुमार मदनलाल बरमेचा (वय 52 रा.केडगाव) या उद्योजक कुटुंबीयांना नगर-पुणे महामार्गावर न्हावरा फाट्याचे पुढे “नमो फर्निचर” या दुकानासमोर गाडी पंचर झाल्याने स्टेफनी बदलण्यासाठी थांबले असताना रात्री 10 च्या सुमारास “कोयता गँग” ने कोयत्याचा धाक दाखवून सोन्याचे दागिने रोख रक्कम असा 3 लाख 10 हजार रुपयांचा मुद्देमाल लुटला असून याप्रकरणी धन्यकुमार बरमेचा यांनी शिरूर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार तीन अनोळखी चोरट्यांविरोधात जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, धन्यकुमार बरमेचा हे कुटुंबासह मुंबई येथे गेले होते. तेथून काम आटोपून कारने (क्र. एम. एच. 16 सी. वाय. 9929) मागील मंगळवारी (दि.3) नगरकडे येत होते. पुणे-नगर महामार्गावर न्हावरा फाट्याच्या पुढे शिरूरजवळ आल्यावर रात्री 10.30 वाजण्याच्या सुमारास नमो फर्निचर समोर त्यांची गाडी पंक्चर झाली. त्यामुळे त्यांच्या चालकाने गाडी रस्त्याच्या एका बाजूला घेऊन स्टेपणी बदलण्यासाठी ते थांबले असता तेथे दुचाकीवर 25 ते 30 वर्षे वयोगटाचे 3 जण हातात कोयते घेवून आले. आणि म्हणाले ‘येथे का थांबला?’ अशी विचारणा करीत कोयत्याचा धाक दाखवून दमबाजी करत गाडीत असलेल्या महिलांना अंगावरील दागिने काढून देण्यासाठी धमकावले.
त्यानंतर त्यांनी महिलांकडील सोन्याचे मणिमंगळसूत्र, मंगळसूत्राचे पॅडल, डायमंड असलेल्या दोन सोन्याच्या अंगठ्या, सोन्याच्या दोन चेन, डायमंडची अंगठी, रोख दहा हजार रुपये असा एकूण 3 लाख 10 हजार रुपयांचा ऐवज काढून घेत तेथून पोबारा केला. याप्रकरणी धन्यकुमार बरमेचा यांनी शिरूर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार तीन अनोळखी चोरट्यांविरोधात जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास शिरूर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक सुरेशकुमार राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक एकनाथ पाटील करत आहेत.
पुणे शहरासह जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून कोयता गँगने चांगलाच धुमाकूळ घातलेला आहे. हातात कोयते घेवून फिरणार्या या गँगची दहशत दिवसेंदिवस वाढत चालली आहे.या कोयता गँगमुळे स्थानिक नागरिक तसेच व्यापारी देखील हैराण झाले आहेत.

No comments:

Post a Comment