नायलॉन मांजामुळे गळा कापून पडले.. 16 टाके. - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Wednesday, January 11, 2023

नायलॉन मांजामुळे गळा कापून पडले.. 16 टाके.

 नायलॉन मांजामुळे गळा कापून पडले.. 16 टाके.


नागपुर -
 
नायलॉन मांजामुळे घरासमोर रस्त्यावर खेळणाऱ्या चिमुकलीचा गळा कापला गेल्याची घटना  असतानाच पुन्हा एकदा मांजामुळे एका तरुणचा गळा कापून त्याला १६ टाके पडल्याची घटना घडली. नागपुरातील राणी दुर्गावती चौक परिसरात सायकलने जात असताना शाहनवाज हुसैन मलिक (१८) असे या विद्यार्थ्याचा गळा कापला. त्याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू असून त्याला १६ टाके पडल्याचे डाॅक्टरांनी सांगितले. ६ जानेवारी रोजी ५ वर्षीय मुलीचा गळा कापल्याची घटना नागपुरातील फारूकनगर भागात घडली होती. या घटनेतील मुलगी बचावली. मात्र, तिला २६ टाके पडले असून तिच्यावर आता उपचार सुरू आहेत. दरम्यान, नॉयलान मांजावर बंदी असूनही त्याची विक्री होतच आहे.


No comments:

Post a Comment