एडवोकेट संदीप भोगाडे यांच्या नूतन कार्यालयाचे उद्घाटन माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले यांच्या हस्ते संपन्न. - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Sunday, January 29, 2023

एडवोकेट संदीप भोगाडे यांच्या नूतन कार्यालयाचे उद्घाटन माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले यांच्या हस्ते संपन्न.

 एडवोकेट संदीप भोगाडे यांच्या नूतन कार्यालयाचे उद्घाटन माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले यांच्या हस्ते संपन्न.


अहमदनगर -
कौडगावसारख्या ग्रामीण भागातून नगर शहरात आलेल्या भोगाडे परिवाराची येथील व्यावसायिक प्रगती नेत्रदीपक आहे. ग्रामीण भागातून शहरात व्यवसायासाठी येणार्‍या नवयुवकांसाठी भोगाडे परिवाराने मिळविलेले यश नक्कीच प्रेरणादायी ठरेल, असे गौरवोद्गार भाजप नेते, माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले यांनी काढले.
स्टेट बँक चौकाजवळील भिंगार छावणी परिषदेच्या श्री छत्रपती शिवाजी महाराज व्यापारी संकुलात . संदीप नामदेव भोगाडे यांच्या अद्ययावत नूतन कार्यालयाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी अ‍ॅड. भोगाडे यांचे वडील नामदेव भोगाडे व आई चंद्रकला भोगाडे यांच्यासह महेंद्र भोगाडे, नानासाहेब भवर, सतीश पठारे, अ‍ॅड. पाखरे, पठारे, अ‍ॅड. संदीप पाखरे अमोल भिगारदिवे, रेहान शेख, अमोल भिगारदिवे, रेहान शेख, प्रदीप विजय कांडके, प्रदीप भोगाडे, विजय कांडके, धनंजय खर्से आदी उपस्थित होते.
माजी मंत्री कर्डिले म्हणाले, की कोणताही व्यवसाय काम करताना अंगी न्रमता व कामात प्रामाणिकपणा असायला हवा. त्यातही अ‍ॅड. संदीप भोगाडे यांची ग्राहकसेवा अत्यंत नम्रपणाची आहेच. तसेच ती प्रामाणिकदेखील आहे. सरकारी कागदपत्रांमध्ये सामान्य माणसाला बर्‍याचदा अडचणी येतात. मात्र, त्या तांत्रिक अडचणींतून कायदेशीर पद्धतीने कसे मार्ग काढावेत, यावर अ‍ॅड. संदीप भोगाडे यांच्याकडूनहोणारे मार्गदर्शन नेहमीच उपयोगी आणि सामान्य माणसाला कायद्याची भाषा कळेल, अशा स्वरूपात ते सांगतात. त्यातही ग्रामीण भागातून आलेल्यांना ते अत्यंत चांगले मार्गदर्शन करतात, असेही माजी मंत्री कर्डिले म्हणाले..
अ‍ॅड. संदीप नामदेव भोगाडे यांनी नव्या कार्यालयातून दिल्या जाणार्‍या ग्राहकसेवेची माहिती दिली. कोणत्याही स्थावर मालमत्ता खरेदी व विक्रीचा दस्तावेज कसा असावा. ज्यामुळे भविष्यात पुन्हा वाद उद्भवणार नाहीत, असा योग्य सल्ला व तांत्रिक मदत या कार्यालयातून दिली जाणार असल्याची माहिती ड. भोगाडे यांनी दिली. महेंद्र भोगाडे व प्रदीप भोगाडे यांनी पाहुण्यांचे स्वागत केले.

No comments:

Post a Comment