अहमदनगर स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई 3 कट्टे, 12 काढतुसासह एक आरोपी जेरबंद. - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Saturday, January 28, 2023

अहमदनगर स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई 3 कट्टे, 12 काढतुसासह एक आरोपी जेरबंद.

 अहमदनगर स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई.

3 कट्टे, 12 काढतुसासह एक आरोपी जेरबंद.


अहमदनगर -
चाँदणी चौक, अहमदनगर येथे तीन (03) गावठी कट्टे व बारा (12) जिवंत काडतुस अवैधरित्या कब्जात बाळगुन बीड जिल्ह्यात विक्रीस घेवुन जाणारा सराईत आरोपी 1,13,700/- रु. (एक लाख तेरा हजार सातशे) रुपये किंमतीचे मुद्देमालासह जेरबंद करून स्थानिक गुन्हे शाखा अहमदनगरने कारवाई केली
राकेश ओला  पोलीस अधिक्षक, अहमदनगर यांनी पो नि. अनिल कटके, स्थानिक गुन्हे शाखा, अहमदनगर यांना जिल्ह्यात अवैध अग्नीशस्त्रे व हत्यारे या विरुध्द जास्तीत जास्त कारवाई करणे बाबत आदेश दिले होते.
अनिल कटके, हे अहमदनगर हे जिल्ह्यातील अवैध अग्नीशस्त्रे व हत्यारे याबाबत माहिती घेत असतांना गुप्तबातमीदारा कडून माहिती मिळाली की, बीड जिल्ह्यातील रेकॉर्डवरील एक आरोपी हा गावठी बनावटीचे कट्टे व जिवंत काडतुस बीड येथे विक्री करण्यासाठी घेवुन जात असुन चाँदणी चौक, आरटीओ ऑफिस समोर, उभा आहे अशी खात्रीशीर माहिती मिळाल्याने पो नि अनिल कटके यांनी  सोपान गोरे, मोहन गाजरे, राजेंद्र वाघ, संजय खंडागळे, भाऊसाहेब काळे, बाळासाहेब मुळीक विजय वेठेकर, देवेंद्र शेलार, सुरेश माळी, संदीप घोडके, शंकर चौधरी, विशाल दळवी, राहुल सोळुंके, रवि सोनटक्के, रविंद्र घुगांसे, विजय धनेधर, सागर ससाणे, मयुर गायकवाड, उमाकांत गावडे भरत बुधवंत अशांनी मिळून फळ विक्रेते व रिक्षा चालक असे वेशांतर करुन मिळालेल्या बातमीचे अनुषंगाने चाँदणी चौक येथे जावुन आरटीओ ऑफिस जवळ सापळा लावुन थांबलेले असताना एक पिवळे रंगाचा टी शर्ट व जिन्स पॅन्ट घातलेला व एक राखाडी रंगाची सॅक असलेला बातमीतील वर्णना प्रमाणे संशयीत इसम दिसला पथकाची खात्री होताच पथक संशयीतास ताब्यात घेण्याचे तयारीत असताना तो पळुन जावु लागला. लागलीच पथकातील अधिकारी व अंमलदारांनी संशयीताचा पाठलाग करुन त्यास शिताफीने ताब्यात घेतले. त्यास त्याचे नाव गांव विचारले असता त्याने त्याचे नाव सुयोग ऊर्फ छोट्या मच्छिंद्र प्रधान, वय 23, रा. माळीवेस, सुभाष रोड, जिल्हा बीड असे असल्याचे सांगीतले. त्याची अंगझडती घेतली असता अंगझडतीत एका राखाडी रंगाचे सॅकमध्ये तीन (03) गावठी बनावटीचे कट्टे व बारा (12) जिवंत काडतूस मिळून आल्याने त्याला ताब्यात घेऊन त्याच्याकडे गावठीकट्टे व काडतुसा बाबत विचारपुस करता सुरुवातीस तो समाधानकारक उत्तरे न देता उडवा उडवीची उत्तरे देवु लागला. त्यास अधिक विश्वासात घेवुन सखोल व बारकाईने तपास करता त्याने सदर गावठीकट्टे व जिवंत काडतुस विक्री करीता बीड जिल्ह्यात घेवुन जात असल्याचे सांगितले. 
ताब्यातील आरोपीकडे तीन (03) गावठी कट्टे, बारा (12) जिवंत काडतूस व एक राखाडी रंगाची सॅक असा एकुण 1,13,700/- रु. किंमतीचा मुद्देमाल मिळुन आल्याने सदर बाबत राजेंद्र देवमन वाघ  यांनी भिंगार कॅम्प पोलीस स्टेशन येथे दिलेल्या फिर्यादीवरुन भिंगार कॅम्प पोलीस स्टेशन आर्म ऍ़क्ट 3/25, 7 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून  पुढील  तपास भिंगार कॅम्प पोलीस स्टेशन करीत आहे.
आरोपी सुयोग मच्छिंद्र प्रधान हा सराईत गुन्हेगार असुन त्यांचे विरुध्द पुणे, औरंगाबाद, बीड व अहमदनगर जिल्ह्यात दरोडा, जबरी चोरी, चोरी व दुखापत असे गंभीर स्वरुपाचे एकुण 25 गुन्हे दाखल आहेत 
सदरची कारवाई  राकेश ओला, पोलीस अधीक्षक, अहमदनगर  प्रशांत खैरे  अपर पोलीस अधिक्षक, अहमदनगर अनिल कातकाडे उपविभागीय पोलीस अधिकारी, नगर शहर विभाग यांचे सुचना  मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी केलेली आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here