पत्रकाराचा कॅमेरा चोरणारा सराईत आरोपी जेरबंद. - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Saturday, January 28, 2023

पत्रकाराचा कॅमेरा चोरणारा सराईत आरोपी जेरबंद.

 पत्रकाराचा कॅमेरा चोरणारा सराईत आरोपी जेरबंद.

नगर तालुका पोलीस ठाण्याची कामगिरी.


नगरी दवंडी 
अहमदनगर : पत्रकाराचा कॅमेरा व व्हिडीओग्राफीचे साधने चोरणारा सराईत आरोपी पुणे येथून अटक करण्यात आला आहे. ही कारवाई  नगर तालुका पोलीसांनी केली असून आरोपीकडून २ लाख ८९ हजार किंमतीचा कॅमेरा, लेन्स, अडॅपटर, फिल्टर जप्त करण्यात आले आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे कीं, नगर तालुका पो.स्टे.  गु.र.नं.१६/२०२३ भादवि कलम ३७९ प्रमाणे दाखल गुन्हयातील फिर्यादी सोहेल मुस्तफा मनियार रा.चिचोंडी पाटील ता. जि. अहमदनगर यांनी भातोडी येथून लग्न समारंभ सुरु असताना कॅमेरा, लेन्स व अडॅपटर असा २ लाख ८९ हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल अज्ञात चोरटयांनी चोरुन नेला असल्याची तक्रार नगर तालुका पोलीस ठाणेस दिली  होती. वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली सदर गुन्हयाचा तपास सुरु होता.
 गोपनीय बातमीदारामार्फत सपोनि राजेंद्र सानप यांना सदरची चोरी ही संदीप धर्मा पवार रा. भोसरी जि.पुणे याने केली असल्याची व तो भोसरी येथे आला असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार एक पथक पुणे येथे  (दि. २६) रोजी पुणे येथे पाठविण्यात आले होते. स्थानिक भोसरी पोलीसांचे मदतीने आरोपीस ताब्यात घेवून नगर तालुका पोलीसांनी आरोपीकडून 
१,लाख १८ हजार  रुपये किंमतीचा एक कॅनान कंपनीचा कॅमेरा, १ लाख ६५ हजार रुपये किंमतीच्या कॅमेऱ्याच्या लेन्स, ४ हजार ५०० रुपये किंमतीचा कॅमेरा अडॅपटर  १५हजार  रुपये किंमतीचे कॅमेरा फिल्टर असा एकूण  २,लाख ८९,हजार  रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. आरोपीवर पुणे जिल्हयामधेही विविध कलमांखाली गुन्हे दाखल आहेत.
ही कारवाई  पोलीस अधिक्षक  राकेश ओला, अपर पोलीस अधिक्षक  प्रशांत खैरे,  उपविभागीय पोलीस अधिकारी अजित पाटील यांचे सुचना व मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेंद्र सानप नगर तालुका पोलीस स्टेशन, पो.उप.नि. रणजीत मारग, पो.हे.कॉ. शैलेश सरोदे, पोना आनंद घोडके, मपोना गायत्री धनवडे, पोकों.संदीप जाधव, पोकों विशाल टकले, पोकों ज्ञानेश्वर खिळे यांच्या पथकाने केली आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here