भुईकोट किल्ला कायमस्वरूपी पर्यटनासाठी खुला होण्यासाठी प्रयत्न करणार - आमदार संग्राम जगताप. - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Thursday, January 26, 2023

भुईकोट किल्ला कायमस्वरूपी पर्यटनासाठी खुला होण्यासाठी प्रयत्न करणार - आमदार संग्राम जगताप.

 भुईकोट किल्ला कायमस्वरूपी पर्यटनासाठी खुला होण्यासाठी प्रयत्न करणार - आमदार संग्राम जगताप.

26 जानेवारी रोजी नगरकरांची भुईकोट किल्ला पाण्यासाठी गर्दी.


नगर -  
शहराला ऐतिहासिक,सांस्कृतिक, धार्मिक परंपरा लाभलेली आहे.आपल्या भुईकोट किल्ल्याला मोठा इतिहास लाभला आहे याची माहिती संपूर्ण देशात व्हायला हवी आजच्या युवा पिढीला आपल्या इतिहासाची ओळख होण्यासाठी भुईकोट किल्ला पर्यटनासाठी खुला होणे गरजेचे आहे. भुईकोट किल्ल्याच्या सुशोभीकरणासाठी राज्य सरकारकडून पाच कोटी रुपयांचा निधी मंजूर करून आणला आहे परंतु लष्कराच्या ताब्यात असल्यामुळे परवानगी अभावी हा निधी खर्च करता येत नाही भुईकोट किल्ला नागरिकांना पाहण्यासाठी फक्त 26 जानेवारी व 15 ऑगस्ट रोजी खुला केला जातो हा किल्ला कायमस्वरूपी पर्यटनासाठी खुला केल्यास देशभरातून नागरिक नगर शहरात भुईकोट किल्ला पाहण्यासाठी येतील व पर्यटनाला चालना मिळेल याचबरोबर रोजगार निर्मिती होईल आज प्रजासत्ताक दिनानिमित्त नागरिकांनी हजारोंच्या संख्येने भुईकोट किल्ला पाण्यासाठी गर्दी केली होती. भुईकोट किल्ला कायमस्वरूपी खुला होण्यासाठी पाठपुरावा करणार असल्याचे प्रतिपादन आ.संग्राम जगताप यांनी केले.

26 जानेवारी निमित्त भुईकोट किल्ला नागरिकांसाठी खुला केला जातो यानिमित्त आ. संग्राम जगताप यांनी पाणी केली यावेळी नगरसेवक समद खान,संतोष लांडे हजारो नागरिक यावेळी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here