तांबे पिता पुत्रांनी दिला काँग्रेसला दगा. - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Friday, January 13, 2023

तांबे पिता पुत्रांनी दिला काँग्रेसला दगा.

 तांबे पिता पुत्रांनी दिला काँग्रेसला दगा.

सत्यजित ताबेंना पाठिंबा देणार नाही - नाना पटोले.


मुंबई:
 सत्यजीत तांबे यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज भरणे आणि त्यांनी निवडणूक बिनविरोध करण्यासाठी भाजपचा पाठिंबा मागणे, हे सर्व पूर्वनियोजित आहे. सुधीर तांबे यांनी काँग्रेस पक्षाशी दगाफटका केला आहे. त्यामुळे पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत काँग्रेस पक्ष सत्यजीत तांबे यांना पाठिंबा देणार नाही, अशी घोषणा काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली. काल काँग्रेसचे अधिकृत उमेदवार सुधीर तांबे उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले होते. मात्र, ऐनवेळी सुधीर तांबे यांनी शेवटच्या क्षणी माघार घेतली आणि त्यांचे पुत्र सत्यजीत तांबे यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला होता. त्यामुळे काँग्रेसच्या गोटात एकच खळबळ उडाली होती.
यासंदर्भात बोलताना नाना पटोले यांनी काँग्रेस पक्ष सत्यजीत तांबे यांना पाठिंबा देणार नाही, असे स्पष्ट केले. आम्ही सगळ्या घडामोडींवर लक्ष ठेवून आहोत. आम्ही काल रात्री संपूर्ण अहवाल हायकमांडला पाठवला आहे. आज हायकमांड निर्देश देईल त्यानंतर पुढील कारवाईचा निर्णय घेऊ. पण बंडखोर उमेदवाराला काँग्रेसचा पाठिंबा राहणार नाही, असे नाना पटोले यांनी स्पष्ट केले. सुधीर तांबे यांनी फॉर्म न भरता पक्षासोबत फसवेगिरी केली आहे. त्यांनी आपल्या मुलाला अपक्ष फॉर्म भरायला लावला. त्यानंतर सत्यजीत तांबे म्हणाले की, आम्ही भाजपचा पाठिंबा घेणार आहोत. हा काँग्रेस पक्षाशी दगाफटका असल्याचेही नाना पटोले यांनी सांगितले.

No comments:

Post a Comment