नगर शहरात दोन तरुणांची गळफास घेऊन आत्महत्या.. - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Wednesday, February 1, 2023

नगर शहरात दोन तरुणांची गळफास घेऊन आत्महत्या..

 नगर शहरात दोन तरुणांची गळफास घेऊन आत्महत्या..


अहमदनगर -
2 तरुणांनी राहत्या घरात गळफास घेत आत्महत्या केल्याच्या घटना केडगाव उपनगर व जेऊर बायजाबाई (ता. नगर) येथे घडल्या.यासंदर्भात कोतवाली व एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. जेऊर येथील तोडमलवाडी येथे राहणारा तरुण राकेश भाऊसाहेब तोडमल (वय 23) याने राहत्या घरात गळफास घेत आत्महत्या केली.  संभाजी प्रभाकर बोरूडे (वय 32 रा. शास्त्रीनगर, केडगाव) यांनी त्यांच्या राहत्या घरात स्कार्पने गळफास घेत आत्महत्या केली. यासंदर्भात कोतवाली पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. 


No comments:

Post a Comment