या महामार्गावर लक्झरी बसचा भीषण अपघात, ४ ठार, २० हून अधिक जखमी - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Wednesday, February 1, 2023

या महामार्गावर लक्झरी बसचा भीषण अपघात, ४ ठार, २० हून अधिक जखमी

 या महामार्गावर लक्झरी बसचा भीषण अपघात, ४ ठार, २० हून अधिक जखमी.


दौंड : 
पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर चौफुला नजीक वाखारी हद्दीत बस आणि ट्रक यांचा भीषण अपघात झालाय. या अपघातात ४ प्रवाशांचा जागीच मृत्यू झालाय तर २० हून अधिक प्रवाशी गंभीर जखमी झालेत. मृतांची संख्या वाढण्याची शक्यताही व्यक्त केला जातोय.
लक्झरी बस सोलापूरहून पुण्याच्या दिशेने जात होती. चौफुला ओलांडल्यानंतर वाखारी हद्दीत एका ट्रकचा टायर फुटल्याने तो ट्रक महामार्गावरच थांबला होता. यादरम्यान सोलापूरवरुन पुण्याला निघालेल्या लक्झरी बस चालकाला ट्रकचा अंदाज न आल्याने बस ट्रकला धडकली. महामार्गाच्या कडेला उभ्या असलेल्या ट्रकला बसची जोरदार धडक बसली. हा अपघात एवढा भीषण होता की बसच्या एक बाजूचा चक्काचूर झालाय.
अपघातात ४ प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला असून २० हून अधिक प्रवासी जखमी झाले आहेत. जखमींना यवत आणि केडगावमधील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून काहींना पुण्याच्या रुग्णालयात देखील नेण्यात आल्याची माहिती मिळतीये. घटनास्थळी यवत पोलीस दाखल झाले असून अपघातासंदर्भाने पुढील चौकशी करत आहेत.


No comments:

Post a Comment