ह.भ.प. बंडातात्या कराडकरांची तब्येत बिघडली, पुण्यात दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात दाखल. - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Friday, January 13, 2023

ह.भ.प. बंडातात्या कराडकरांची तब्येत बिघडली, पुण्यात दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात दाखल.

 ह.भ.प. बंडातात्या कराडकरांची तब्येत बिघडली, पुण्यात दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात दाखल.


सातारा : 
ह.भ.प. बंडातात्या कराडकर यांची प्रकृती ढासळल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. चक्कर आल्यामुळे बंडातात्यांची तब्येत खालावली. त्यांना पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. शरीरात रक्ताची गुठळी तयार झाल्याचा प्राथमिक अंदाज डॉक्टरांनी वर्तवला आहे. व्यसनमुक्त भारत, गो हत्याबंदी कायदा व्हावा यासाठी बंडातात्यांनी मोलाचं योगदान दिलं आहे.
हभप बंडातात्या कराडकर हे महाराष्ट्रातील ज्येष्ठ कीर्तनकार आहेत. तसेच ते समाज प्रबोधनकारही आहेत. त्यांनी संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीसाठी आंदोलन करण्याचा त्यांनी इशारा दिला होता.
यापूर्वी गोहत्या बंदी कायद्यासाठी त्यांनी चक्क मुख्यमंत्र्यांना अडवलं होतं. गोहत्या बंदी कायदा महाराष्ट्रात लागू करण्यासाठी त्यांनी मुख्यमंत्र्यांची शासकीय महापूजा रोखण्याचा इशारा दिला होता. त्यावेळी राज्यात काँग्रेस-राष्ट्रवादीचं सरकार होतं आणि पृथ्वीराज चव्हाण महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते.
हभप बंडातात्यांनी १९९६ मध्ये व्यसनमुक्त युवक संघाची स्थापना केली होती. व्यसनाच्या आहारी गेलेल्या तरुणांना व्यसनमुक्त करण्यासाठी ही संस्था काम करते. गेल्या वीस वर्षांपासून बंडातात्यांचं कार्य सुरू आहे. त्याशिवाय युवकांना इतिहास माहिती व्हावा म्हणून ते गडकिल्ल्यांवर प्रतापी संस्कार सोहळ्याचे आयोजन करतात. जवळपास २५ वर्षांपासून हा उपक्रम सुरुच आहे.
२०१९ मध्ये 'पद्मश्री' पुरस्कारासाठी राज्य सरकारने केंद्र सरकारकडे प्रस्ताव पाठवण्यासाठी बंडातात्या कराडकरांकडून त्यांची माहिती मागवली. त्यावर आपण कोणतााही पुरस्कार स्वीकारत नाही, असं सांगत त्यांनी स्वतःच्या कार्याची माहिती देण्यास नकार दिला होता.

No comments:

Post a Comment