रस्त्याच्या जवळच आढळला 21 वर्षीय तरुणीचा मृतदेह.. - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Saturday, January 7, 2023

रस्त्याच्या जवळच आढळला 21 वर्षीय तरुणीचा मृतदेह..

 रस्त्याच्या जवळच आढळला 21 वर्षीय तरुणीचा मृतदेह..


ठाणे :
कसारा जंगलात एका तरुणीचा मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. या तरुणीच्या मृतदेहावर चाकुने वार केल्याच्या जखमा आढळल्याची माहिती दिली आहे. तरुणीचा मृतदेह गुरुवारी सायंकाळी कसारा जंगलात एका प्रवाशाला आढळल्यानंतर त्याने याबाबतची माहिती कसारा पोलिसांना दिली. त्यावरुन पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवला आहे. सदर तरुणीचं वय 21 ते 25 वर्षे इतके असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कसार्‍याजवळील वारली करंजपाडा गावातील जंगलात जाणार्‍या रस्त्याच्या कडेला तरुणीचा मृतदेह एका प्रवाशाच्या नजरेस पडला होता. त्यानंतर सदर प्रवाशाने मृतदेहाविषयीची माहिती कसारा पोलिसांना दिली. माहिती मिळताच गुरुवारी सायंकाळी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा करत तरुणीचा मृतदेह शहापूरमधील शासकीय उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदनासाठी हलवला.
पोलिसांनी याप्रकरणी अज्ञात आरोपीविरोधात भादंवि कलम 302 प्रमाणे गुन्हा दाखल करून आरोपीचा शोध सुरू केला. मात्र ही तरुणी कुठून आली, तिची निर्घृण हत्या करून तिचा मृतदेह जंगलात रस्त्याच्या कडेला असलेल्या निर्जनस्थळी फेकून देण्यामागचा हेतू काय आहे, याबाबतचा तपास पोलिसांकडून अद्याप सुरू आहे. लवकरच आरोपीला पकडण्यात येईल, त्यानंतरच या गुन्ह्याची संपूर्ण माहिती देण्यात येईल, असं वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांच्याकडून सांगण्यात आलं आहे.

No comments:

Post a Comment