जामखेड तालुक्यातील पत्रकारांचा मा. सरपंच समीर पठाण यांच्यावतीने गुणगौरव. - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Tuesday, January 10, 2023

जामखेड तालुक्यातील पत्रकारांचा मा. सरपंच समीर पठाण यांच्यावतीने गुणगौरव.

 जामखेड तालुक्यातील पत्रकारांचा मा. सरपंच समीर पठाण यांच्यावतीने गुणगौरव.


नगरी दवंडी/प्रिंतनिधी
जामखेड ः तालुक्यातील पाटोदा गरडाचे येथे पत्रकार दिना निमित्त माजी सरपंच समीरभाई पठाण मित्र परिवाराच्या वतीने तोफांच्या आतिष बाजीत मोठ्या उत्साहात स्वागत करून  जामखेड तालुक्यातील पत्रकार बांधवाचे सत्कार करून सन्मान दिला.
     ग्रामपंचरायत कार्यालयात आयोजित केलेल्या पत्रकार सत्कार कार्यक्रमास माजी सरपंच समीर भाई पठाण,सरपंच अशोक गव्हाणे,अनिल थोरात , ग्रामपंचायत सदस्य सदाशिव कवादे ,खालिद भाई पठाण, इस्माईल भाई पठाण ,अन्सार भाई पठाण, अक्षय आमटे, गोकुळ महारनवर, राजू मोरे, प्रकाश शिंदे ,ग्रामपंचायत कर्मचारी भाऊसाहेब शिंदे ,पंडित मोरे, सोमनाथ सोनवणे ,दीपक समुद्र, शेरखान पठाण, मोहिद्दिन सय्यद पाटोदा सांगवी खामगाव चे ग्रामस्थ उपस्थित होते.
   यावेळी सरपंच पठाण म्हणाले समाजातील अनेक समस्या शासन दरबारी पत्रकारांमुळे सुटतात लोकशाहीत पत्रकार अत्यंत महत्वाचा घटक आहे. लोकांचा आवाज सरकारपर्यंत पोहोच करण्याचे काम खर्‍या अर्थाने पत्रकार करत आहे.पत्रकारांचा सन्मान करणे हे आपले आद्यकर्तव्य आहे असे पठाण यांनी सांगितले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here