चारित्र्यावरील संशयावरून पत्नीसह मुलाचा गळा आवळून खून. - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Monday, January 9, 2023

चारित्र्यावरील संशयावरून पत्नीसह मुलाचा गळा आवळून खून.

 चारित्र्यावरील संशयावरून पत्नीसह मुलाचा गळा आवळून खून.


औरंगाबाद -
चारित्र्यावर संशय घेऊन पतीने पत्नी आणि अडीच वर्षाच्या मुलाचा खून केल्‍याची धक्‍कादायक घटना औरंगाबादेतील कांचनवाडी भागात आज पहाटे घडली.आरती समीर म्हस्के (वय २९, रा. भाग्यनगर, आनंदविहार रोड ), निशांत समीर म्हस्के अशी मृतांची नावे आहेत.
सातारा पोलिसांनी आरोपी पती समीर विष्णू म्हस्के याला ताब्यात घेतले आहे. समीरच्या आईचाही आरोपींमध्ये समावेश आहे, अशी माहिती पोलिस निरीक्षक प्रशांत पोतदार यांनी दिली. चारित्र्यावर संशय घेऊन पत्नी आणि मुलाचा गळा आवळून खून केल्याची माहिती आरोपीनेच फोन करून पोलिसांना दिल्‍याचे, पोलीस उपनिरीक्षक संभाजी गोरे यांनी सांगितले.

No comments:

Post a Comment