दौंडच्या सात जणांच्या हत्तेचे प्रकरण ताजे असतानाच पुन्हा.. या गावात आढळला युवकाचा मृतदेह. - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Sunday, January 29, 2023

दौंडच्या सात जणांच्या हत्तेचे प्रकरण ताजे असतानाच पुन्हा.. या गावात आढळला युवकाचा मृतदेह.

दौंडच्या सात जणांच्या हत्तेचे प्रकरण ताजे असतानाच पुन्हा.. या गावात आढळला युवकाचा मृतदेह.


दौंड :
महाराष्ट्राला हादरवून टाकणारी दौंड तालुक्यातील हत्याकांडाची घटना ताजी असतानाच दौंडमधल्याच जिरेगाव येथे एका युवकाचा मृतदेह आढळून आला आहे. सदर युवकाचा खून करून दौंड हद्दीतील जिरेगाव येथे आणून टाकल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार खून झालेल्या युवकाचे वय अंदाजे 25 ते 30 वर्ष असून तो बारामती येथील असावा अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. दौंड तालुक्यात मागील काही दिवसात खून करून मृतदेह आणून टाकण्याचे प्रकार वाढले आहेत.
दौंडमध्ये कौटुंबिक वादातून सात जणांचे मृतदेह भीमा नदीत आणून टाकल्याची घटना ताजी असतानाच पुन्हा एकदा खून करून मृतदेह आढळल्याची घटना समोर आली आहे. त्यामुळे पोलिसांनी अधिक सतर्क होऊन मुख्य रस्ते, हायवे, दौंड तालुक्याला लागून असणारी नदी व डोंगरा भागात गस्त वाढवण्याची मागणी होत आहे.
सदर मृत युवकाच्या डोक्यात छातीवर गंभीर इजा असल्याचे प्रथमदर्शनी दिसून येत आहे. सदर मृत युवक हा बारामती शहरातील खंडोबा नगर येथील असल्याचे बोलले जात आहे. घटनास्थळी बारामतीचे अप्पर पोलीस अधीक्षक व दौंडचे उपविभागीय पोलीस अधिकारी यांनी भेट दिली आहे. पोलीस पुढील तपास करत आहेत.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here