अहमदनगर नामांतराबाबत खा. सुजय विखेंचा भाजपाचे पडळकर यांना घराचा आहेर... म्हणाले असे की - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Monday, January 2, 2023

अहमदनगर नामांतराबाबत खा. सुजय विखेंचा भाजपाचे पडळकर यांना घराचा आहेर... म्हणाले असे की

 अहमदनगर नामांतराबाबत खा. सुजय विखेंचा भाजपाचे पडळकर यांना घराचा आहेर.


अहमदनगर - राज्य सरकारने त्यांचे मत नगरकरांवर लादू नये. नगरचे नामांतर करा ही नगरमधून मागणी झालेली नाही. अहमदनगरच्या नामांतराचा निर्णय घेताना नगरकरांचे मत विचारात घेणे आवश्यक आहे. ते जोपर्यंत काही मत देत नाही. तोपर्यंत राज्य सरकारने नामांतराची प्रक्रिया सुरू करू नये. जिल्ह्याबाहेरून कोणी मत व्यक्त केले म्हणून निर्णय घेतला तर त्याचे पडसाद स्थानिक पातळीवर उमटतील, असा थेट आणि स्पष्ट घरचा आहेर भाजपचे खा.डॉ. सुजय विखे यांनी नामांतराची मागणी करणारे भाजप आ.गोपीचंद पडळकर यांना देताना नामांतराला विरोध असल्याची स्पष्ट भूमिका मांडली.
भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर व परभणी जिल्ह्यातील युवा मोर्चाचे अध्यक्ष सुरेश भुमरे यांनी राज्य सरकार व नगरच्या महापालिकेला पत्र लिहून अहमदनगरचे नाव ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी नगर’ असे करावे अशी मागणी केली आहे. त्यांनी नगरच्या महापालिकेलाही तसे पत्र पाठवले आहे. नागपूर विधिमंडळाच्या अधिवेशनातही आमदार पडळकर यांनी ही मागणी केली. त्यावर शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी विधान परिषदेत उत्तर देताना या मागणीचा प्रस्ताव केंद्र सरकारकडे पाठवला जाईल तसेच स्थानिक पातळीवर महापालिकेकडून ठराव मागितला असल्याचे सांगितले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here