पारनेर शहरातील प्रवेशद्वारावर लावलेल्या त्या कंटेनरमुळे.. - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Tuesday, January 3, 2023

पारनेर शहरातील प्रवेशद्वारावर लावलेल्या त्या कंटेनरमुळे..

 पारनेर शहरातील प्रवेशद्वारावर लावलेल्या कंटेनरमुळे सामान्य नागरीकांना मानसिक त्रास..

पुढार्‍यांच्या हस्ते नवीन कंटेनरचे उद्घाटन.


नगरी दवंडी/प्रिंतनिधी
पारनेर ः पारनेर शहरातील प्रवेश द्वारा जवळ सलग चार  तास एक भला मोठा नविन कंटेनर लावलेला असल्यामुळे प्रवेशद्वार मधुन येणार्‍या जाणार्‍या सामान्य नागरीकांना नाहक मानसिक त्रास सहन करावा लागत असल्याने  नागरीक संताप व्यक्त करत होते. प्रवेशद्वारा समोर मारुतीच मंदिर असल्याने नागरीक एखाद नविन वाहन खरेदी केले की या मंदिरा समोर पूजन करण्यासाठी आणतात.त्या प्रमाणे हा नवीन कंटेनर आणण्यात आला होता. सलग चार  तास हा कंटेनर प्रवेश द्वारा जवळ आडवा लावलेला होता. त्या मुळे वेशितून येणार्‍या जाणार्‍या नागरिकांना याचा नाहक मानसिक त्रास सहन करावा लागला होता.तालुक्यातील जबाबदार नेत्याच्या हस्ते नवीन कंटेनरच उद्घाघाटन असल्याने तो कंटेनर वेशीत आडवा लावलेला होता. जेव्हा तालुक्यातील नेत्याला व पदाधिकारी यांना वेळ मिळाला तेव्हा या कंटेनरच नारळ फोडून उद्घघाटन झाल तेव्हा या प्रवेशद्वाराचा मार्ग मोकळा झाला.पारनेर शहराला कोणी वाली आहेच की नाही असा प्रश्र्न या निमित्ताने उपस्थीत होतो.हिच चूक जर सामान्य नागरिकांनी केली असती तर त्याला नक्कीच आर्थिक भुर्दंड बसला असता.मात्र येथे तेरी चूप मेरी चूप अशी परिस्थिती आहे. पारनेर शहरातील प्रवेशद्वाराचे विद्रुपीकरण कधी थांबेल असा प्रश्न सामान्य नागरीक उपस्थित करत आहेत.
मागिल काही वर्षा पूर्वी शहराला शोभेल असा थोर समाजसेवक महात्मा ज्योतिबा फुले यांचा पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण दि.29जुलै 2009रोजी विधान परिषद सदस्य, उपनेता व  प्रवक्ता शिवसेना आ.डॉ.नीलम गोर्‍हे यांचे हस्ते करण्यात आले होते तेंव्हा शहराच्या वैभवात भर पडल्याचे चित्र होते.पण पुतळ्याच्या आजूबाजूला श्रद्धाजलीच्या फ्लेक्सनी अतिक्रमण केल्याने प्रवेश द्वाराचे विदृपीकरन झाले आहे.
ज्ञानज्योति सावित्रीबाईं फुले या भारताच्या पहिल्या महीला शिक्षिका तसेच थोर समाजसेविका होत्या त्यांचा जन्म 3जानेवारी 1831 ला झाला. त्यांची आज जयंती असताना माञ प्रवेश द्वाराजवळ असणार्‍या पूर्णाकृती थोर समाजसेवक महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पुतळ्याच्या स्वचछता बाबत नगर पंचायत अनभिज्ञ असल्याचे वास्तव दिसून येत आहे  पाराशर ऋषींच्या पावणभूमीतील पारनेर शहरातील पुरातन प्रवेशद्वार अतिशय आकर्षक मनमोहक अप्रतिम शहराला शोभेल असे सौंदर्य आहे. तसेच या प्रवेश द्वारावर थोर समाजसेवक महात्मा ज्योतिबा फुले यांचा पूर्णाकृती पुतळा आहे. पारनेर ला सेनापती बापट यांचा वारसा आहे.शहरात बारा ज्योित्लिंग आहे. मागिल काही वर्षा पूर्वी या थोर समाजसेवक महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पूर्णाकृती पुतळा शेजारी सुंदर पाण्याचे कारांजे होते पण नगर पंचायत दुर्लक्ष मुळे बंद झालेले आहेत. पण काही उतावीळ नागरिकांमुळे या सुंदर अश्या प्रवेश द्वाराचे स्मशान झाले आहे. या प्रवेशद्वारा जागाही शिल्लक राहत नाही एवढे मृत व्यक्तीचे श्रद्धांजलीचे भले मोठाले फ्लेक्स, कार्यकर्ता वाढदिवस, पारितोषीक मिळवलेले फ्लेक्स, दुकान जाहिरात त्या मुळे पारनेरच प्रवेशद्वार फ्लेक्सच्या अतिक्रमणाच्या विळख्यात सापडले आहे. पारनेर नगर पंचायतच्या नगरसेवकां वर शहर स्वच्छ सुंदर ठेवण्याची जबाबदारी असताना माञ फ्लेक्सच अतिक्रमण करण्यात भावी नगरसेवकच अग्रेसर असताना दिसून येतात. त्या मुळे उतावीळ नागरिकांचीही फावते आहे.फलेक्सच्या अतिक्रमणमुळे प्रवेशद्वाराचे विदृपीकरण झाले आहे. थोर समाजसेविका सावित्रीबाई फुले यांची जयंती आलेली असताना मात्र नगर पंचायत प्रशासन दुर्लक्ष करत आहे . त्यांना महापुरुषांच्या विचारांचा विसर पडलेला दिसतो आहे. पारनेर शहरातील शांतता कमिटी समाजसेवी संस्था, सामाजिक कार्यकर्ते, शहरातील पुढारी, नगर पंचायत प्रशासन नगरसेवक, सामान्य नागरीक सर्वांनी मिळून शहरातील या सुंदर अश्या प्रवेशद्वाराच पावित्र राखणे कर्तव्य आहे. नगर पंचायत प्रशासन या प्रवेश द्वाराजवळील फलेक्सच अतिक्रमणवर कार्यवाही करेल. शहराच नाक असलेलं प्रवेशद्वार सुंदर ठेवेल अशी माफक आशावाद सामान्य नागरीकांना वाटत आहे.

No comments:

Post a Comment