मागासवर्गीय महिलेवर 8 वर्ष अत्याचार. - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Saturday, December 31, 2022

मागासवर्गीय महिलेवर 8 वर्ष अत्याचार.

 आरोपीवर अत्याचार अ‍ॅट्रोसिटीसह विविध कलमान्वये गुन्हा दाखल.

मागासवर्गीय महिलेवर 8 वर्ष अत्याचार.


श्रीगोंदा -
विवाहाचे आमीष दाखवून 8 वर्ष श्रीगोंदा येथील मागासवर्गीय महिलेवर अत्याचार करणार्‍या मोहन दत्तू होले (रा.कुकडी कॉलनी श्रीगोंदा) याचेवर भा.द.वि कलम 376(2)(N),417,324,323,504,506 सह अ.जा.ज.अ.प्र.का.क 3(1)(R), 3(1)(S),3(2)(Va),3 (2)(V) प्रमाणे गुन्हा दाखल केला असून पोलिसांनी आरोपी मोहन होले यास जेरबंद केले असून या घटनेचा पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी अण्णासाहेब जाधव,कर्जत विभाग कर्जत हे करत आहे

श्रीगोंदा शहरातील एक मागासवर्गीय महिला आणि मोहन दत्तु होले (रा.कुकडी कॉलनी श्रीगोंदा जिल्हा अहमदनगर) यांची 8 वर्षांपूर्वी सुरवातीला ओळख झाली ओळखीचे रूपांतर प्रेमात झाले आणि मोहन होले यांनी त्या मागासवर्गीय महिलेला मी तुज्याशी लग्न करतो असे आमिष दाखवून 8 वर्षाच्या कालावधीत विविध ठिकाणी वेळोवेळी लग्नाचे आमिष दाखवून बळजबरी केली.मात्र 8 वर्ष वेळोवेळी बलात्कार केल्यानंतर पीडित महिला लग्नासाठी आग्रह करू लागताच मोहन दत्तु होले रा.कुकडी कॉलनी, श्रीगोंदा,ता.श्रीगोंदा,जि.अहमदनगर यांनी स्पष्ट नकार दिला व पीडित महिलेस जातीवाचक शिवीगाळी दमदाटी करुन लाथाबुक्याने तसेच लाकडी दांडक्याने मारहाण करुन फिर्यादीचे दोन्ही हातावर,दोन्ही डोळ्याजवळ व पाठीवर दुखापत करुन जिवे मारण्याची धमकी दिली त्यानंतर पीडित महिलेने श्रीगोंदा पोलीस ठाण्यात आरोपी मोहन दत्तु होले वर गुन्हा दाखल केला आहे.

No comments:

Post a Comment