मेहुण्यावर गोळीबार.. साला पोलिसांच्या ताब्यात. - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Saturday, December 31, 2022

मेहुण्यावर गोळीबार.. साला पोलिसांच्या ताब्यात.

 बहिणीने आंतरजातीय विवाह केल्याचा राग.

मेहुण्यावर गोळीबार. साला पोलिसांच्या ताब्यात.


शिर्डी -
मुंबईतून शिर्डीत पालखीद्वारे साईबाबांच्या दर्शनाला आलेल्या निलेश पवार यावर कुटुंबीयांच्या विरोधात जाऊन आंतरजातीय विवाह केल्याने संतप्त झालेला साला (विकी भांगे रा.पुसद जि.यवतमाळ) यांने काल दुपारी पालखी शिर्डीज- वळील सावळीविहीर येथे नाष्टाकरण्यासाठी थांबली असताना विकीने गावठी कट्टयातुन दाजी निलेश पवारवर दोन गोळ्या झाडल्या. त्या निलेशच्या खांद्याला लागल्या. गोळीबारानंतर विकी पळून जाण्याच्या प्रयत्नात असताना अन्य पदयात्रेतील भक्तांनी त्याला पकडून चोप देत पोलिसांच्या ताब्यात दिले. गोळीबारातील जखमी व आरोपी अशा दोघांनाही साईबाबा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
सदर घटनेची हकीकत अशी की, यवतमाळ जिल्ह्यातील पुसद येथील विकी भांगे याच्या बहिणीने दोन वर्षापूर्वी निलेश पवार या तरुणाबरोबर कुटुंबाच्या इच्छेविरुद्ध लग्न केले होते. तिचा नवरा हा मुंबईला वाहन चालक म्हणून राहत होता. कुटुंबियांच्या इच्छेविरुद्ध झालेल्यालग्नाचा विकी भांगे याच्या मनात निलेश पवार विषयी राग होता. तो निलेशला संपवण्यासाठी संधीच्या शोधातच होता. द्वारकाधीश ही मुंबईतील गोरेगावातील साई पालखीने दहा पंधरा दिवसांपूर्वी शिर्डीकडे प्रस्थान केले होते. मुंबईतुन निलेश पवार व त्याची पत्नी या पालखीसोबत पायी शिर्डीला साईदर्शनासाठी निघाले. याची माहिती पुसद येथे रा- हणार्‍या विकी भांगेला समजली. निलेशचा काटा काढण्याच्या मनसुब्याने तो या पालखी सहभागी झाला. पदयात्रेतच दाजीचा काटा काढण्याचा निर्णय त्याने घेतला. मुंबईपासुनच तो पालखीच्या पाळतीवर होता. पालखी शिर्डीपासून पाच किलोमीटर अंतरावर आली तरी त्याला दाजीच्या गेमची संधी मिळत नव्हती. अखेर काल त्याला ही संधी मिळाल्यानंतर त्याने गावठी रिवाल्वर मधून गोळ्या झाडल्य.
गोळीबारातील जखमी निलेश पवार व पदयात्रींच्या मारहाणीत किरकोळ जखमी झालेला आरोपी विकी भांगे या दोघांनाही उपचारासाठी साईसंस्थानच्या रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. निलेशचा धोका टळल्याचे पोलिसांनी सांगितले. आरोपी विकी भांगे याच्या विरोधात पोलीसांनी गुन्हा दाखल केला असून त्याच्याकडील गावठी कट्टा जप्त केला आहे. पोलीस उपअधिक्षक संजय सातव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक गुलाबराव पाटील पुढील तपास करत आहेत.


No comments:

Post a Comment