चांगले काम करणार्‍या अधिकार्‍यांवर सुडभावनेने कारवाई केली आहे ः राजेंद्र कोठारी. - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Friday, December 30, 2022

चांगले काम करणार्‍या अधिकार्‍यांवर सुडभावनेने कारवाई केली आहे ः राजेंद्र कोठारी.

 चांगले काम करणार्‍या अधिकार्‍यांवर सुडभावनेने कारवाई केली आहे ः राजेंद्र कोठारी.


नगरी दवंडी/प्रिंतनिधी
जामखेड ः कर्जत विभागाचे प्रांतधिकारी अजित थोरबोले व कर्जतचे तहसीलदार नानासाहेब आगळे यांचे झालेले निलंबन व जामखेडचे मुख्याधिकारी मिनीनाथ दंडवते यांची बदली यांच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस व महाविकास आघाडीच्या वतीने आज अकरा वाजता मोर्चा काढण्यात आला व तहसीलदार योगेश चंद्रे यांना निवेदन देण्यात आले.राष्ट्रवादीच्या वतीने सरकार व आ. राम शिंदे यांनी अधिकार्‍यांवरील केलेल्या कारवाईबाबत निषेध व्यक्त केला.
यावेळी बोलताना राजेंद्र कोठारी म्हणाले कर्जत जामखेड हा शांतताप्रिय मतदार संघ आहे वेगवेगळ्या पक्षातील कार्यकर्ते हे ऐकमेकांचे चांगले मित्र आहेत त्यामुळे आमच्यात तत्व वेगळी असली तरी मैत्री कायम राहिली या मतदारसंघात राजकीय दहशतवाद कधीच नव्हता परंतु मागील अडीच वर्षेच्या काळापासून तो सुरू झाला आहे
आ. रोहीत पवार यांनी जो विकासाचाचे काम सुरू केले आहे त्या कामाला विरोधकांची नजर लागली आहे त्यामुळेच चांगले काम करणार्‍या अधिकार्‍यांवर सुडभावनेने कारवाई केली आहे.
यावेळी राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस राजेंद्र कोठारी, जेष्ठ नेते वैजीनाथ पोले, सुरेश भोसले, प्रकाश सदाफुले, राजेंद्र पवार, कर्जत जामखेड विधानसभा क्षेत्र प्रमुख प्रा. मधुकर राळेभात, दत्तात्रय वारे, चेअरमन सुंदरदास बिरंगळ, सुर्यकांत मोरे, राजेंद्र गोरे, प्रा.राहुल अहिरे, प्रकाश काळे, उमर कुरेशी, सरपंच नरेंद्र जाधव, मोहन पवार, रमेश आजबे, निखिल घायतडक, अमित जाधव, पवन राळेभात, प्रा.विकी घायतडक, महेश राळेभात, युवा नेते प्रविण उगले, अभय शिंगवी, प्रशांत राळेभात ,हरीभाऊ आजबे, सरपंच बाळासाहेब खैरे, समीरभाई पठाण, संतोष पवार, बापु शिंदे, बजरंग डुचे, अमर चाऊस, अमोल गिरमे, पिंटू बोरा, सचिन शिंदे, शरद शिंदे, वसीम सय्यद, मनोज भोरे, युवराज उगले, प्रसन्न कात्रजकर, दिपक नेटके, नितीन हुलगुंडे, जुबेर शेख, दादा महाडिक, ऋषि कुंजीर, संदिप गायकवाड आदी पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

No comments:

Post a Comment