न्यू आर्ट्स कॉलेज व पुण्याचा भक्ती वेदांत रिसर्च यांच्यात सामंजस्य करार. - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Friday, December 30, 2022

न्यू आर्ट्स कॉलेज व पुण्याचा भक्ती वेदांत रिसर्च यांच्यात सामंजस्य करार.

न्यू आर्ट्स कॉलेज व पुण्याचा भक्ती वेदांत रिसर्च यांच्यात सामंजस्य करार.


अहमदनगर - 
न्यू. आर्ट्स कॉमर्स ॲण्ड सायन्स कॉलेज अहमदनगर (तत्त्वज्ञान विभाग) व भक्ती वेदांत रिसर्च सेंटर, पुणे यांच्यात सामंजस्य करार" न्यू. आर्ट्स, कॉमर्स ॲण्ड सायन्स कॉलेज, अहमदनगर मधील तत्त्वज्ञान विभाग आणि भक्ती वेदांत रिसर्च सेंटर, पुणे यांचे मध्ये 'सामंजस्य करार'  आज दि. ३०/१२/२०२२ रोजी न्यू आर्टस्, कॉमर्स ॲण्ड सायन्स कॉलेज मध्ये पार पडला. या प्रसंगी भक्ती वेदांत रिसर्च सेंटर, पुणे चे मानद संचालक डॉ के.एन. धुमाळ, अधिष्ठाता डॉ. जनार्दन चितोडे, प्राचार्य डॉ. बी. एच. झावरे सर, उपप्राचार्य डॉ. अनिल आठरे व तत्त्वज्ञान विभाग प्रमुख डॉ. अमन बगाडे उपस्थित होते.
या प्रसंगी सामंजस्य कराराच्या माध्यमातून या दोन्ही संस्थांमध्ये शिक्षण, संशोधन, समाज, संस्कृती व पर्यावरण संरक्षण विषयक संशोधन व कृती कार्यक्रमाप्रित्यर्थ विद्यार्थी व प्राध्यापकांचे आदानप्रदान करण्याचे ठरले आहे.
या कार्यक्रमाप्रसंगी बोलताना प्राचार्य डॉ. बी. एच. झावरे सरांनी अतिथी संस्थेच्या मान्यवरांचे स्वागत केले व आपल्या प्रास्ताविकात सांगितले की, आमच्या महाविद्यालयाने पायजमा विद्यालयापासून केलेली सुरूवात आजच्या देशातील चौथ्या क्रमांक व महिराष्ट्रातील प्रथम क्रमांकावर घेतलेली झेप नगरकरांसाठी अभिमानास्पद बाब आहे. ते पुढे म्हणाले की आता आमच्या महाविद्यालयाचा सुरू असलेला प्रवास    राज्य, देश व आंतरराष्ट्रीय पातळीवर नेण्यासाठी आमचा प्रयत्न आहे. सध्या आम्ही त्या प्रयत्नांना लंडनच्या ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीशी झालेल्या करारा पर्यंत घेऊन गेलो आहोत, तसेच आम्हाला आमच्या विद्यार्थ्यांना  समाज, संस्कृती व पर्यावरण संरक्षण सारख्या मानवतावादी विचारांशी जोडण्यासाठी आम्ही भक्ती वेदांत रिसर्च सेंटर, पुणे यांचेशी करार करत आहोत. आम्हाला खात्री आहे की, हा आमचा प्रयत्न पुढे नैतिक समाज निर्माण करण्यासाठी उपयुक्त ठरेल.
या कार्यक्रमप्रसंगी बोलताना भक्ती वेदांत रिसर्च सेंटरचे मानद संचालक डॉ. के. एन. धुमाळ म्हणाले की, आमच्या रिसर्च सेंटरचा न्यू. आर्ट्स कॉमर्स ॲण्ड सायन्स कॉलेज, अहमदनगर या आंतरराष्ट्रीय पातळीवर पोहोचलेल्या महाविद्यालयाशी सामंजस्य करार करताना खूप आनंद होत आहे. या महाविद्यालयाच्या एकूणच जडणघडणीत आमच्या संस्थेत चालणा-या विविध समाज, संस्कृती व तत्त्वज्ञान विषयक संशोधन व प्रशिक्षण कोर्सेसचा उपयोग महाविद्यालयातील विद्यार्थी व प्राध्यापकांना या सामंजस्य कराराच्या माध्यमातून होईल.
कार्यक्रमाच्या प्रसंगी कला शाखेतील विद्यार्थ्यांसाठी 'भारतीय संस्कृती आणि मानवी मूल्यांची उपयोगीता' या विषयावर डॉ. जनार्दन चितोडे सरांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. या व्याख्यानाच्या माध्यमातून त्यांनी भारतीय समाज आणि संस्कृतीची महती विद्यार्थ्यांना विशद करताना भारतीय समाज व संस्कृतीतील रामायण, महाभारतातील अनेक व्यवहारोपयोगी उदाहणांचा आढावा घेतला. त्यांच्या या प्रबोधनात्मक व्याख्यानाचा विद्यार्थ्यांनी अतिशय शांतपणे आश्वाद घेतला.
या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी डॉ. नागेश शेळके, प्रा. भारत होळकर, प्रा. हरिदास गावीत, प्रा. मयुर रोहोकले व प्रा. सागर सप्रे यांनी परिश्रम घेतले.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य डॉ. बी. एच. झावरे सरांनी केले, अतिथी परिचय डॉ. अमन बगाडे यांनी केले, या कार्यक्रमाचे आभार प्रा. सुखदेव लोखंडे तर सुत्रसंचलन डॉ. अर्चना रोहोकले यांनी केले.
या कार्यक्रमाच्या निमित्ताने अहमदनगर जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेचे अध्यक्ष मा. नंदकुमार झावरे पाटील साहेब, उपाध्यक्ष मा. रामचंद्र दरे साहेब, सचिव मा. जी.डी. खानदेशे साहेब व सहसचिव मा. विश्वासराव आठरे पाटील साहेब यांनी अभिनंदन केले.

No comments:

Post a Comment