साकतखुर्दच्या उपसरपंचपदी मीना चितळकर यांची निवड. - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Friday, December 30, 2022

साकतखुर्दच्या उपसरपंचपदी मीना चितळकर यांची निवड.

 साकतखुर्दच्या उपसरपंचपदी मीना चितळकर यांची निवड.


नगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः नगर तालुक्यातील साकतखुर्द ग्रामपंचायतच्या उपसरपंचपदी मीना बाबासाहेब चितळकर  यांची गुरुवारी (दि.29) दुपारी  निवड झाली. नवनिर्वाचित लोकनियुक्त सरपंच डॉ. नंदू दत्तात्रय पवार यांच्या अध्यक्षतेखाली ही निवड प्रक्रिया पार पडली.
सारोळा कासार  ग्रामपंचायतीची निवडणूक दि.18 डिसेंबरला  झाली होती.  उपसरपंच निवडीसाठी नवनिर्वाचित सदस्यांची पहिलीच बैठक गुरुवारी (दि.29) दुपारी पार पडली. या विशेष सभेत उपसरपंचपदासाठी मीना बाबासाहेब चितळकर यांची निवड घोषित करण्यात आली. त्यांच्या अर्जावर सूचक म्हणून श्रीधर पवार यांनी स्वाक्षरी केली होती. या निवडीसाठी निवडणुक निरीक्षक  भोसले साहेब  यांनी काम पाहिले.
यावेळी झुंबर पवार, बाबासाहेब चितळकर, सुभाष पवार, प्रा. विठ्ठल वाघमोडे, पाराजी चितळकर, अशोक शिंदे, डॉ. विशाल पवार,
 विष्णू चितळकर, माणिक शिंदे,साखरबाई कोळेकर, सिदु निमसे, शिवाजी बोचरे, मल्हारी चितळकर, राजू वाघमोडे,  बाबासाहेब धनगर,  अविनाश पवार, राजू पवार, पोपट चितळकर,, देवराम चितळकर, बाबासाहेब राधुजी चितळकर,
विलास शिंदे,अर्जुन शिंदे,गोवर्धन पवार  भानुदास पवार, दत्तू बोचरे, शरद निमसे, अविनाश निमसे,बापू वाघमोडे पांडुरंग शिंदे,तात्या वाघमोडे,रामदास दरेकर, शेखर बोचरे, गोविंद निमसे आदी उपस्थित होते.
यावेळी नवनिर्वाचित सदस्य श्रीधर पवार, पप्पू बोचरे, मोहन वाघमोडे, मयूर भोसले, ग्रामविकास अधिकारी आर. व्ही. कराळे यासह ग्रामस्थ उपस्थित होते. या निवडीनंतर नवनिर्वाचित सरपंच, उपसरपंच व सदस्यांचा ग्रामस्थांच्या वतीने सत्कार करण्यात आला.

No comments:

Post a Comment