गुरु गोविंदसिंह यांच्या जयंतीनिमित्त रक्तदान शिबिरास प्रतिसाद. - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Friday, December 30, 2022

गुरु गोविंदसिंह यांच्या जयंतीनिमित्त रक्तदान शिबिरास प्रतिसाद.

 गुरु गोविंदसिंह यांच्या जयंतीनिमित्त रक्तदान शिबिरास प्रतिसाद.

राष्ट्रहित संवर्धनक मंडळाचा उपक्रम.


नगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः  शिख धर्माचे 10 वे गुरु व खालसा पंथाचे संस्थापक गुरु गोविंदसिंह यांची 356 वी जयंती निमित्त नगरच्या राष्ट्रहित संवर्धनक मंडळाच्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. रा.स्व.संघाच्या केशावार्पण कार्यालयात झालेल्या या शिबिराचे उद्घाटन सामाजीक कार्यकर्ते हरजितसिंग वधवा यांच्या हस्ते प्रतिमा पूजनाने झाले. यावेळी संघाचे जिल्हा संघचालक डॉ.रवींद्र साताळकर, जिल्हा कार्यवाह वाल्मिक कुलकर्णी, शहर संघचालक हिराकांत रामदासी, राष्ट्रहित संवर्धनक मंडळाचे अध्यक्ष महेंद्र चंदे, उपाध्यक्ष प्रशांत आढाव, कोषाध्यक्ष किशोर गांधी, सदस्य श्रीकांत खाजगीवाले, सुनील नागोरी, अनिल सबलोक आदींसह नागरिक उपस्थित होते. जनकल्याण रक्तपेढीच्या सहकार्याने झालेल्या या रक्तदान शिबिरास युवक व नागरिकांचा उत्फूर्त प्रतिसाद मिळाला.
यावेळी हारजीतसिंग वधवा यांनी गुरु गोविंदसिंह यांच्या जीवनावर प्रकाश टाकला. ते म्हणाले, मुघल सम्राट औरंगजेबने मोठ्या प्रमाणात काश्मिरी ब्राह्मणांचे धर्मांतर चालवले होते. त्यावेळी केवळ 9 वर्षाचे असलेले गुरु गोविंदसिंह यांनी आपल्या वडिलांसह औरंगजेब विरोधात लढा उभारला. आयुष्यभर लढत राहिले, 1699 साली खालसा पंथाची स्थापना करून देशाच्या, हिंदूंच्या व शीख धर्माच्या रक्षणासाठी पूर्ण जीवन वेचले. राज घराणे सोडून देशासाठी सर्वस्व अर्पण करून बलिदान दिले. अशा महान योध्याच्या जयंतीनिमित्त झालेले रक्तदान शिबीर खूप स्तुत्य उपक्रम आहे.
प्रास्ताविकात राष्ट्रहित संवर्धनक मंडळाचे अध्यक्ष महेंद्र चंदे म्हणाले, राष्ट्रहित संवर्धनक मंडळ अनेक सामाजिक कामांमध्ये व सेवा प्रकल्पात काम करत आहे. कोविड संकट काळात स्वयंसेवकांनी घरोघरी धान्य वाटप करून नागरिकांना आधार दिला. गुरु गोविंदसिंह हे महान देशभक्त होते. त्यांच्या शौर्याचे स्मरण करत रक्तदान करून त्यांची जयंती राष्ट्रहित संवर्धनक मंडळाने साजरी केली आहे.
यावेळी जनकल्याण रक्तपेढीचे जनसंपर्क अधिकारी डॉ.विलास मढीकर, डॉ.गुलशन गुप्ता, अशोक चौधरी, अनिल देवराव आदींसह नागरिक उपस्थित होते.

No comments:

Post a Comment