युवकांमध्ये समाज परिवर्तनाची ताकद : प्रा.ज्ञानेश्वर कवाद. - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Friday, December 30, 2022

युवकांमध्ये समाज परिवर्तनाची ताकद : प्रा.ज्ञानेश्वर कवाद.

 युवकांमध्ये समाज परिवर्तनाची ताकद : प्रा.ज्ञानेश्वर कवाद.


नगरी दवंडी/प्रिंतनिधी
पारनेर ः पारनेर  तालुक्यातील पानोली येथे  सी.टी.बोरा महाविदयालय शिरुर  महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विशेष श्रमसंस्कार शिबिरात युवक राष्ट्राची संपत्ती  या विषयावर सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ बहि:शाल शिक्षण मंडळाचे वक्ते शिवव्याख्याते प्रा. ज्ञानेश्वर कवाद यांचे  व्याख्यान झाले.
शिबिराचे उदघाटन शिबिराचे उदघाटन सी.टी.बोरा महाविदयालय  नियामक मंडळाचे अध्यक्ष मा. प्रकाश धारीवाल, शिरुर शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष  अनिल बोरा, शिरूर शिक्षण प्रसारक मंडळाचे सदस्य धर्मचंद फुलफगर,  शिरूर शिक्षण प्रसार मंडळाचे सचिव मा. नंदकुमार निकम, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. के सी मोहिते यांच्या शुभहस्ते झाले.
यावेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना शिवव्याख्याते प्रा.ज्ञानेश्वर कवाद म्हणाले , युवकांना योग्य मार्गदर्शन मिळाल्यास आजचे युवक  राष्ट्रउभारणीसाठी महत्त्वाची भुमिका बजावतील.युवकांनी यश संपादन करण्यासाठी महापुरुषांच्या विचाराचे अनुकरण गरजेचे आहे.स्वामी विवेकानंद यांनी भारतीय तत्त्वज्ञान जगासमोर मांडले.भगतसिंगांनी भारतमातेला स्वातंत्र्य करण्यासाठी बलिदान दिले.हा आदर्श ठेवुन भारतीय संस्कृती जपणे काळाची गरज आहे. मुलांमधील कलागुणांना वाव देवुन देशासाठी सकारत्मक योगदान देण्याचे विचार मुलांमध्ये रुजवल्यास जगावर भारत देशाचे प्रभुत्व निर्माण झाल्याशिवाय राहणार नाही.
यावेळी  कार्यक्रम अधिकारी डॉ ब्रिजेश तांबे, डॉ. सिद्धार्थ कांबळे, प्रा. मंजुषा पाटील, प्रा. दिलीप टोणगे, डॉ. समाधान बोरसे ,प्रा.संतोष खोडदे ,जिल्हा दुध संघाचे संचालक  दादाभाऊ वारे.मा.सरपंच शिवाजी शिंदे ,उपसरपंच प्रशांत साळवे आदी मान्यवर उपस्थितीत होते.

No comments:

Post a Comment