खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी जेरबंद. - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Thursday, December 29, 2022

खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी जेरबंद.

खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी जेरबंद.

श्रीरामपूर तालुका पोलिसांची कारवाई.

अहमदनगर :-औरंगाबाद येथे खुन करुन फरार झालेल्या आरोपीस श्रीरामपूर तालुका पोलीस स्टेशनच्या कर्मचाऱ्यांनी चार तासात पकडले.दि.29.12.2022 रोजी प्रभारी अधिकारी ज्ञानेश्वर थोरात श्रीरामपुर तालुका पोलीस ठाणे,यांना सचिन इंगोले,वांळुज पोलीस ठाणे औरंगाबाद शहर यांनी कळविले की, गुन्हयातील आरोपी सचिन शामराव नाटकर (रा.भोकर,ता.श्रीरामपुर जि. अहमदनगर) याने 12 वर्षापुर्वी त्याच्या बहिनीला पळवून नेण्याचे कारणावरुन इसम बाबासाहेब छबुराव खिलारे (रा.भोकर ता. श्रीरामपुर,जि.अहमदनगर) याचा आज दि.29.12.2022 रोजी सांय.05.00 वा चे सुमारास खुन केला आहे.आरोपी सचिन शामराव नाटकर याचा शोध घेण्यास कळविले असता,सदर आरोपी बाबत गुप्त बातमीदारा मार्फत माहिती मिळाली की,आरोपी नामे सचिन शामराव नाटकर हा त्याची मोटार सायकलने नेवासाकडुन भोकर ता.श्रीरामपुर येथे जात आहे.यावरुन आरोपीचा भोकर ते खोकर फाटा परिसरात शोध घेत असताना सदरचा आरोपी श्रीरामपुर कडे जाणारे रोडजवळ दिसला तेव्हा सदर आरोपीस पोलिसांची चाहुल लागताच तो शेजारचे ऊसाचे शेतात पळुन जात असताना त्याचा पाठलाग करुन पथकातील अधिकारी व अंमलदार यांनी मोठया शिताफीने 7.15 वा सुमा ताब्यात घेवुन श्रीरामपुर तालुका पोलीस स्टेशन येथे आणले आहे.सदर अरोपीचे नाव व पत्ता विचारले असता त्याचे नाव सचिन शामराव नाटकर वय 24 वर्षे धंदा मजुरी,रा भोकर ता.श्रीरामपुर जि.अहमदनगर असे असल्याचे सांगितले असुन त्यास हिरो स्प्लेंडर मोटार सायकल नंबर MH.15 AN.6285 आरोपी व वाहनासह सचिन इंगोले व पथक वाळुज पोलीस स्टेशन जि.औरंगाबाद यांचे गुन्हयाचे तपासकामी ताब्यात देण्यात आले आहे.सदरची कामगीरी राकेश ओला पोलीस अधीक्षक, स्वाती भोर अपर पोलीस अधीक्षक श्रीरामपुर आणि संदिप मिटके उपविभागिय पोलीस अधिकारी,श्रीरामपुर विभाग यांचे सुचना व मार्गदर्शनाखाली श्रीरामपुर तालुका पोलीस स्टेशनचे ज्ञानेश्वर थोरात,सहा.पोलीस निरीक्षक,पोलीस उपनिरीक्षक संजय निकम व अतुल बोरसे, हबीब अली, अनिल शेंगाळे, प्रशांत रणनवरे, संदिप पवार यांनी केली आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here