भिंगार कॅम्प पोलिसांचा पत्याच्या क्लबवर छापा. - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Friday, December 30, 2022

भिंगार कॅम्प पोलिसांचा पत्याच्या क्लबवर छापा.

 भिंगार कॅम्प पोलिसांचा पत्याच्या क्लबवर छापा.


नगर -
नगर पाथर्डी रोडवर भिंगार मधील भीमनगर कमानीच्या आडोशाला पत्र्याच्या शेडमध्ये चालू असलेल्या तिरट जुगारावर भिंगार कॅम्प पोलिसांनी दि.३० डिसेंबर रोजी रात्री १२ वा. सुमारास धाड टाकून १,१७,१०० रु. रोख रक्कम जप्त करून एकूण सात जणांवर कारवाई केली. बापु सुर्यभान तोडमल वय 47 वर्षे जेऊर ता.जि.अहमदनगर, सद्दाम सिकंदर खान वय 32 वर्षे रा.केडगाव बँक काँलनी,अहमदनगर, गिताराम मधुकर काळे वय 40 वर्षे रा.ब्राम्हण गल्ली,भिंगार ता.जि.अहमदनगर, आकाश बाबुराव दाणवे वय 32 वर्षे रा.प्रेमदान हडको ता.जि.अहमदनगर, माधव रखमा भोसले रा.नालेगाव ता.जि.अहमदनगर, मुकेश लक्ष्मण गोहेर रा.पंपींग स्टेशन,भिंगार ता.जि.अहमदनगर, फैजान रउफ शेख रा.गरीब नवाज काँलनी, राहुल राजेंद्र द्वारके यांच्या फिर्यादीवरून भिंगार कॅम्प पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.सदरची कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला,अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे,उपविभागीय पोलीस अधिकारी अनिल कातकडे यांच्या मार्गदर्शनाखाली भिंगार कॅम्प पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक शिशिरकुमार देशमुख, अजय नगरे, राहुल द्वारके, गणेश जठार, भागचंद लगड यांनी केली आहे.

No comments:

Post a Comment