पंतप्रधानांना मातृशोक; नरेंद्र मोदींच्या आई हीराबेन मोदी यांचे निधन. - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Thursday, December 29, 2022

पंतप्रधानांना मातृशोक; नरेंद्र मोदींच्या आई हीराबेन मोदी यांचे निधन.

पंतप्रधानांना मातृशोक; नरेंद्र मोदींच्या आई हीराबेन मोदी यांचे निधन.

१०० व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास.

अहमदाबाद: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मातोश्री हीराबेन मोदी यांचे निधन झाले. अलीकडेच आजारी पडल्याने हीराबेन यांना अहमदाबाद येथील सुपर स्पेशालिटी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. हीराबेन यांची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात आले होते. मात्र, उपचारादरम्यान हीराबेन यांचे निधन झाले. १८ जून रोजी हीराबेन यांनी १०० व्या वर्षात पदार्पण केले होते.
गुरुवारी मध्यरात्री अचानक हीराबेन मोदी यांची प्रकृती खालावली. डॉक्टरांनी तातडीने उपचार सुरू केले. मात्र, उपचारादरम्यान हीराबने यांची प्राणज्योत मालवली. हीराबेन यांच्या निधनावर सामाजिक तसेच राजकीय क्षेत्रातून शोक व्यक्त केला जात आहे. हीराबेन मोदी यांच्या मागे पंतप्रधान नरेंद्र मोदी, सोमभाई, अमरुतभाई, प्रल्हादभाई, पंकजभाई ही मुलं आणि मुलगी वासंतीबेन यांच्यासह सुना, नातवंडे, पतरुंड असा मोठा परिवार आहे.
हीराबेन यांची तीन दिवसांपूर्वी प्रकृती बिघडली होती. त्यामुळे त्यांना तात्काळ अहमदाबादच्या यूएन मेहता रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते.आईची तब्येत बिघडल्याचे कळताच पंतप्रधान नरेंद्र मोदी तातडीने अहमदाबाद येथे दाखल झाले होते. रुग्णालयात सुमारे तासभर थांबले होते. आपल्या आईच्या प्रकृतीची विचारपूस केली होती. हीराबेन यांच्यावर गेल्या तीन दिवसांपासून रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र वृद्धापकाळ आणि आजारपण यामुळे हीराबेन यांची प्रकृती अधिकच खालावली. उपचाराला साथ न दिल्याने अखेर त्यांची रुग्णालयातच प्राणज्योत मालवली. 

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here