अध्यक्षपदी पाटील, उपाध्यक्षपदी शिर्के तर सचिवपदी दांगट यांची निवड. - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Wednesday, December 21, 2022

अध्यक्षपदी पाटील, उपाध्यक्षपदी शिर्के तर सचिवपदी दांगट यांची निवड.

 नगर शहर बार असोसिएशनची निवडणूक संपन्न.

अध्यक्षपदी पाटील, उपाध्यक्षपदी शिर्के तर सचिवपदी दांगट यांची निवड.


नगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः अहमदनगर बार असोसिएशनच्या पदाधिकारी निवडणुकीसाठी काल जिल्ह्य न्यायालयात मतदान झाले व त्याच दिवशी मतमोजणी झाली. या निवडणुकीत अध्यक्षपदी अ‍ॅड. संजय पाटील व उपाध्यक्षपदी अ‍ॅड. राजाभाऊ शिर्के व सचिवपदी गौरव दांगट यांनी विजय मिळवला. मुख्य निवडणूक निर्णय अधिकारी अ‍ॅड. एल.के.गोरे  यांनी रात्री साडे अकरा वाजता निकाल जाहीर केल्यावर जिल्ह्य न्यायालयात वकिलांनी जल्लोष करत गुलालाची उधळून विजयोत्सव साजरा केला.
या निवडणुकीत कोणत्याही उमेदवाराने माघार न घेतल्याने सर्व जागांची निवडणूक बहुरंगी झाली. 1179 मतदारांपैकी 797 मतदारांनी मतदान केले. दुपारी मतदान प्रक्रिया संपल्यावर सायंकाळी लगेचच मतमोजणी झाली. रात्री उशिरा सर्व निकाल हाती आले. कार्यकारणी सदस्य पदी निवडून आलेले अ‍ॅड.रोहित कळमकर यांनी 583 सर्वाधिक मते घेवून विजय मिळवला. यावेळी संघटनेचे मावळते अध्यक्ष अ‍ॅड.अनिल सरोदे व उपाध्यक्ष अ‍ॅड. संदीप वांढेकर यांनी सर्व नूतन पदाधिकारींचे अभिनंदन केले.
अध्यक्ष पदासाठी झालेल्या निवडणुकीत उमेदवार अ‍ॅड. संजय पाटील यांना 366 मत मिळाली तर विरोधातील अ‍ॅड. स्वाती पाटील यांना 213 मते व अ‍ॅड.सुनील सूर्यवंशी 202 मते मिळाली. उपाध्यक्ष पदासाठी अत्यंत चुरशीच्या झालेल्या निवडणुकीत उमेदवार अ‍ॅड. राजाभाऊ शिर्के (209) यांनी अ‍ॅड. भगवान कुंभकर्ण (206) यांच्यावर  केवळ 3 मतांनी विजय मिळवला. उपाध्यक्षपदासाठी अन्य उमेदवारांना मिळालेली मते अशी अ‍ॅड. अजित वाडेकर (204), अ‍ॅड.अनुराधा येवले (170). सचिव पदी विजयी झालेले अ‍ॅड. गौरव दांगट (534) यांनी विरोधक अ‍ॅड.प्रवीण पालवे (243) यांच्यावर विजय मिळवला. सहसचिव पदी विजय झालेले अ‍ॅड.अजिंक्य काळे (540) यांनी विरोधी अ‍ॅड. महेश शिंदे (197) यांच्यावर विजय मिळवला. महिला सहसचिवपदी विजयी झालेल्या अ‍ॅड. अशा गोंधळे (435) यांनी विरोधी अ‍ॅड. आरती गायकवाड (221) व अ‍ॅड. सरिता साबळे (113) यांच्यावर मात केली खजिनदार पदी विजयी झालेले अ‍ॅड. सुनील तोडकर (398) यांनी विरोधक अ‍ॅड.शिवाजी शिरसाठ (361) यांच्यावर विजय मिळवला. महिला कार्यकारणी पदी विजयी झालेल्या अ‍ॅड. प्रिया जगताप (393) यांनी अ‍ॅड.प्रणाली भुयार (348) यांच्यावर मात केली.
कार्यकारणी सदस्यपदी निवडून आलेले उमेदवार व त्यांना मिळालेले मत असे, अ‍ॅड.रोहित कळमकर (583), अ‍ॅड. नितीन खैरे (549), अ‍ॅड. रामेश्वर कराळे (534), अ‍ॅड. विशाल पठारे (521), अ‍ॅड.रावसाहेब चौधरी (479), अ‍ॅड.अभिजीत पुप्पाल(436). पराभूत झालेले उमेदवार असे अ‍ॅड. सुदाम गवते (391), अ‍ॅड.सुदाम साठे (330) व अ‍ॅड.अय्याज बेग (313) नूतन अध्यक्ष अ‍ॅड. संजय पाटील म्हणाले, वकील संघटनेच्या निवडणुकीत सर्व वकील सहकार्‍यांनी केलेल्या अमुल्य सहकार्याने माझी अध्यक्षपदी निवड झाली आहे. एक वर्षाच्या कालावधीत वकिलांचे प्रलंबित प्रश्न सोडवण्यास प्राधान्य देणार असून सर्वांना बरोबर घेत काम करणार आहे. त्याच बरोबरच नवनवीन उपक्रम वकिलांसाठी राबविणार आहे.
नूतन उपाध्यक्ष अ‍ॅड. राजाभाऊ शिर्के म्हणाले, जिल्हा न्यायालयात वकिलांना कोणताही त्रास होणार नाही याची काळजी सर्व निवडून आलेले पदाधिकारी घेणार असून बार असोसिएशनला कोणतेही गालबोट लागणार नाही असे आश्वासन देतो. नूतन सचिव अ‍ॅड.गौरव दांगट म्हणाले, जिल्हा न्यायालयात न्यायिक अधिकारी व वकिलांमध्ये चांगला समन्वय राहण्यासाठी आम्ही प्रयत्न करू. वकिलांसाठी वर्षभर विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करू. असे सांगितले. निवडून आलेल्या पदाधिकार्‍यांचे समर्थक वकील यावेळी मोठ्यासंख्येने उपस्थित होते. निकाल घोषित होताच मोठ्याप्रमाणात गुलालाची उधळण न्यायालयात करण्यात आली.

No comments:

Post a Comment