पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली शनिवारी जिल्हा नियोजन समितीची बैठक. - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Thursday, December 22, 2022

पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली शनिवारी जिल्हा नियोजन समितीची बैठक.

 पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली शनिवारी जिल्हा नियोजन समितीची बैठक.


नगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः  राज्याचे महसूल, पशुसंवर्धन व दुग्धविकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली शनिवारी सकाळी 10.30 वाजता जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हानियोजन समितीच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे.
या बैठकीत 3 ऑक्टोबर 2022 रोजी झालेल्या बैठकीच्या इतिवृत्तास मान्यता देणे, जिल्हा वार्षिक योजना सन 2022-23 (सर्वसाधारण, आदिवासी व अनुसूचित जाती उपयोजना) या वर्षांचा नोव्हेंबर 2022 अखेर खर्चाचा आढावा, सन 2022-23. पुनर्विनियोजन प्रस्तावास मान्यता देणे, सन 2023-24 (सर्वसाधारण, अनुसूचित जाती व आदिवासी उपयोजना) या आर्थिक वर्षाचा केले. प्रारूप आराखडयास मान्यता देणे तसेच आयत्या वेळेच्या विषयावर या बैठकीत चर्चा करण्यात येणार आहे. याबाबत संबंधित विभागांनी नोंद घ्यावी असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी केले आहे.


No comments:

Post a Comment