अनाधिकृत पत्राशेड व होर्डिंग हटविण्याचे मनपा आयुक्तांचे आदेश. - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Wednesday, December 21, 2022

अनाधिकृत पत्राशेड व होर्डिंग हटविण्याचे मनपा आयुक्तांचे आदेश.

 अनाधिकृत पत्राशेड व होर्डिंग हटविण्याचे मनपा आयुक्तांचे आदेश.


नगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः अहमदनगर महानगरपालिकेचे आयुक्त डॉक्टर पंकज जावळे यांनी महानगरपालिकेत अतिक्रमण विभाग तसेच नगररचना विभाग अधिकार्‍यांबरोबर नगर शहरातील अनधिकृत होर्डिंग आणि पत्रा शेड बाबत एक बैठक घेवून अनधिकृत होर्डिंग व पत्रा शेडचे सर्वेक्षण करून ते हटविण्याचे आदेश दिले आहेत.
अहमदनगर शहरात विविध ठिकाणी जाहिरात फलक लावले जातात मात्र उच्च न्यायालयाने अनाधिकृत होडींग्ज हटविणेबाबत निर्देश दिलेले आहेत त्यामुळे विना परवाना लावलेल्या होर्डिंगवर कारवाई करून होर्डिंग लावणार्‍यांवर गुन्हे दाखल करावेत तसेच नगर शहरातील शहरासह उपनगरामध्ये सध्या पत्रे ठोकून मोठमोठी दुकाने उभी केली गेली आहेत. मात्र या पत्रा शेडला उभारणी साठी महानगरपालिकेकडून कोणतीही परवानगी दिली नसल्याने ते अधिकृत नसून या सर्व पत्रा शेडचे सर्वेक्षण करुन सदरचे अनाधिकृत बांधकाम हटविणेबाबत महानगरपालिका आयुक्तांनी आदेश दिले आहेत.
महानगर पालिकेत झालेल्या बैठकीला मनपा आयुक्त डॉक्टर पंकज जावळे यांच्यासह सहाय्यक संचालक नगररचना राम चारठाणकर, अतिक्रमण विभाग प्रमुख आर. जी. सातपुते, प्रभाग अधिकारी राकेश कोतकर, मेहेर लहारे,नानासाहेब गोसावी तसेच नगररचना व अतिक्रमण विभागाचे सर्व कर्मचारी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here